Jalna Crime News Saam tv
महाराष्ट्र

Jalna Crime News : दुचाकीवरून येत लांबविली २५ लाखाची बॅग; पोलिसांकडून शोध सुरु

Jalna News दुचाकीवरून येत लांबविली २५ लाखाची बॅग; पोलिसांकडून शोध सुरु

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना : शहरातील औद्यागिक वसाहतीत असलेल्या ओम साईराम स्टील कंपनीसमोर दोन अज्ञात चोरट्यानी पैशांनी (Crime News) भरलेली बॅग लांबविली.  भर दिवसा घडलेल्या या घटनेने औद्योगिक परिसरात (Jalna News) एकच खळबळ उडाली आहे. (Breaking Marathi News)

दुपारी एकच्या सुमारास भंगार व्यापारी सुनील बजाज हे आपल्या एका सहकाऱ्यासह स्कुटीवरून २० ते २५ लाखाची रोकड घेऊन बॅकेत भरणा करण्यासाठी जात होते. या दरम्यान दुचाकीवरून (Robbery) आलेल्या दोघांनी स्कुटीला दुचाकी आडवी लावून सुनील बजाज यांच्या हातातील पैशाने भरलेली बॅग हिसकावून पोबारा केला आहे. 

पोलिस घटनास्थळी दाखल 

जालना शहरात दुचाकीवरून जाणाऱ्या भंगार व्यापाऱ्याची पैशाने भरलेली बॅग हिसकावून पोबारा केल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. या घटनेने औद्योगिक परिसरातील व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'गोकुळ'ची निवडणूक बिनविरोध नाहीच? बिनविरोधला सतेज पाटलांचाही विरोध

Burning Feet: पायाचे तळवे अचानक गरम होतात, 'या' ३ आजारांचे असू शकते लक्षण

Maharashtra News Live Update: ठाणे शहरातील चिंतामणी चौकातील एका दुकानाला भीषण आग

राहुल गांधी यांच्यासह महाराष्ट्रातील दोन दिग्गज महिला नेत्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात|VIDEO

विधान परिषद निवडणुकीआधी भाजपची नवी रणनीती; बावनकुळे,मुनगंटीवारांवर मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT