Jalna News Saam tv
महाराष्ट्र

Jalna News : १६ लाखांचे मोबाईल लागले पोलिसांच्या हाती; मूळ मालकांना केले सुपूर्द

Jalna News : जालना जिल्ह्यात मागील काही दिवसात सुमारे १०० मोबाईल हरवले व चोरीस गेल्याच्या तक्रारी सदर बाजार पोलिस ठाण्यात दाखल झाल्या होत्या.

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 

जालना : अनेकदा प्रवासादरम्यान किंवा मार्केटमध्ये मोबाईल चोरीला जातात किंवा हरवत असतात. जालना जिल्ह्यात अशाच प्रकारे चोरी गेलेले आणि हरवलेले तब्बल १६ लाख रुपयांचे ८० मोबाईल शोधण्यात जालना पोलीसांना यश आले आहे. हे सर्व मोबाईल तक्रादाराना परत करण्यात आले आहेत. 

जालना (Jalna) जिल्ह्यात मागील काही दिवसात सुमारे १०० मोबाईल हरवले व चोरीस गेल्याच्या तक्रारी सदर बाजार पोलिस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. त्या अनुषंगाने मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असतांना सदर बाजार पोलिसांनी १०० पैकी ८० मोबाईल फोनचा शोध लावला आहे. हे सर्व मोबाईल कोणाचे आहेत; याचा तपास करत (Jalna Police) आज अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या हस्ते ८० तक्रारदारांना मोबाईल सुपूर्द करण्यात आलेत. 

सुमारे १६ लाख रुपये किंमतीचे असलेले हे मोबाईल सदर बाजार पोलिसांनी शोधून काढले आहेत. यासाठी C.E.I.R प्रणालीच्या माध्यमातून पोलिसांनी हरवलेल्या व चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध लावला आहे. दरम्यान हरवलेले/ चोरीस गेलेले मोबाईल परत मिळाल्याने तक्रारदार यांनी पोलिसांचे आभार व्यक्त केलेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

FASTag Annual Pass: मुंबई पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवर फास्टॅग पास नाहीच!

Cancer progression: शरीरात कशी होऊ लागते कॅन्सरची सुरुवात? प्रत्येक कॅन्सरच्या स्टेजमध्ये रूग्णाच्या शरीरात कसे होतात बदल?

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट

Nagpur University : शिक्षणाच्या आयचा घो! परीक्षेत पैकीच्या पैकी गुण तरीही गुणपत्रिकेत 'नापास'; नागपूरातील ढोबळ कारभार

KBC 17: कौन बनेगा करोडपती सीझन १७चा पहिला करोडपती; ७ कोटींच्या कोणत्या प्रश्नाचे दिले उत्तर?

SCROLL FOR NEXT