Kalyan Crime : प्लंबर बनला ज्योतिष; भविष्य पाहण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाला लुटले

Kalyan News : कल्याण पूर्वेत राहणारे विजय गायकवाड हे केबल व्यावसायिक आहेत. त्यांची पत्नी माजी नगरसेविका आहे.
Kalyan Crime
Kalyan CrimeSaam tv
Published On

अभिजित देशमुख
कल्याण
: सतत आजारी राहणाऱ्या व्यावसायिकाला आजारावर उपाय सांगण्यासाठी घेऊन गेला. त्याठिकाणी बंदुकीचा धाक दाखवून व्यावसायिकाला लुटण्यात आले होते. विशेष म्हणजे ज्या ज्योतिषाकडे नेले तो एक प्लम्बर असून ज्योतिष बनून दोन साथीदारांसह व्यावसायिकाला लुबाडणाऱ्या तिघांना  मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 

कल्याण (Kalyan) पूर्वेत राहणारे विजय गायकवाड हे केबल व्यावसायिक आहेत. त्यांची पत्नी माजी नगरसेविका आहे. दोघेही काही दिवसांपासून आजारी होते. याच गोष्टीचा गैरफायदा घेत याच परिसरात राहणाऱ्या गिरीश खैरे याने गायकवाड यांना लुबाडण्याचा प्लॅन केला. त्याने विजय गायकवाड यांना आपल्या ओळखीतील ज्योतिषाला तुमचा हात दाखवू तो उपाय सांगेल, असे आमिष दिले. यानंतर खैरेने विजय गायकवाड यांना आडीवली येथील एका इमारतीत नेले. तेथे आधीच गिरीश याचा साथीदार विनायक कराळे हा ज्योतिषचा वेष परिधान करून बसला होता. त्याच्या सोबत विनय यादव हा देखील होता. संशय येऊ नये म्हणून गिरीश तेथून निघून गेला. 

Kalyan Crime
Jalgaon News : दुर्दैवी..देवीची आरास करताना तरुणाचा मृत्यू; लाइटिंग टाकताना लागला विजेचा झटका

दरम्यान गिरीश खैरे निघून गेल्यानंतर त्याठिकाणी ज्योतिषच्या वेशभूषेत आलेल्या एका व्यक्तीने विजय गायकवाड यांचा हात पाहण्याचे नाटक केले आणि बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडे २० लाख रुपयांची मागणी केली. मात्र पकडले जाण्याच्या भीतीने विनायक ज्योतिष आणि त्याचा साथीदार विनय तेथून पळून गेले. याबाबतर दाखल तक्रारीवरून (Manpada Police) मानपाडा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गिरीश खैरे याला अटक केली. पुढील तपासात विनायक कराळे आणि विनय जाधव या दोन आरोपींची नावे पुढे आली. विनायक कराळे हा एक प्लंबर असून त्याचा साथीदार विनयने बिहारमधून देशी कट्टा मागवला होता. पोलिसांनी या दोघांना अटक करून देशी कट्टा जप्त केला आहे. डीसीपी अतुल झेंडे आणि एसीपी सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने आणि पोलिस अधिकारी संपत फडोळ यांच्या पथकाने कारवाई केली. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com