Jalna municipal negligence, stray dog control demand 
महाराष्ट्र

Stray Dog : ८-१० मोकाट कुत्र्यांचा हल्ला, अंगाचे लचके तोडले, ७ वर्षाच्या चिमुकलीचा जागेवर मृत्यू

Gandhinagar Jalna tragedy : जालना शहरातील गांधीनगर भागात ७ वर्षाच्या संध्या पाटोळे या चिमुकलीवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

Namdeo Kumbhar

अक्षय शिंदे पाटील, जालना प्रतिनिधी

Jalna municipal negligence, stray dog control demand : जालन्यात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. शहरातील गांधीनगर भागात ही घटना घडलीय. संध्या प्रभुदास पाटोळे (वय 7 वर्ष) असं मयत मुलीचं नाव आहे. संध्या पाटोळे ही चिमुकली अंगणात खेळत असताना तिच्यावर तीन ते चार कुत्र्यांनी हल्ला करत तिचे लचके तोडले. यात चिमुकल्या संध्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून जालना शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे.

चिमुकली घराबाहेरील मैदानावर खेळायला गेली आणि दहा मिनिटात भटक्या कुत्र्यांनी जीव घेतला

शहरातील गांधीनगर परिसरामध्ये संध्या ही चिमुकली सकाळी सात वाजेच्या सुमारास घराबाहेर असलेल्या मैदानावर खेळण्यासाठी गेली. खेळण्यासाठी गेल्यानंतर चार ते पाच भटक्या कुत्र्याने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला आणि हल्ल्यामध्ये संध्या गंभीर जखमी झाली आणि नंतर उपचारासाठी दवाखान्यात नेल असता तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे . या घटनेमुळे परिसरामध्ये एकच हळहळ व्यक्त केली जात आहे..

मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात सात वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

जालना शहरातील गांधीनगर भागामध्ये आज सकाळी सात वाजेच्या सुमारास सात वर्षीय चिमुकलीवर तीन ते चार कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये चिमुकली गंभीर जखमी झाली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

चिमुकलीच्या मृत्यूला जबाबदार कोण

जालना शहरांमध्ये मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा यासाठी विविध संघटनांनी आंदोलन केली मागणी केली मात्र महानगरपालिकेने भटक्या कुत्र्यासंदर्भात कोणतीही ठोस उपाययोजना न केल्यामुळे चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.या चिमुकलीच्या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT