Jalna : तीर्थपुरीत दोन घरावर सशस्त्र दरोडा; सात लाखांचा ऐवज लूटला! SaamTVnews
महाराष्ट्र

Jalna : तीर्थपुरीत दोन घरावर सशस्त्र दरोडा; सात लाखांचा ऐवज लूटला!

दरोडेखोरांच्या चाकू हल्ल्यात एक जण गंभीर जखमी

लक्ष्मण सोळुंके

जालना : घनसावंगी (Ghansavangi) तालुक्यातील तीर्थपुरी येथील खारामळा भागातील कॉलनीत २७ मार्च रोजी पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास अज्ञात दहा ते बारा सशस्त्र दरोडेखोरांनी धुमाकूळ घालून दोन घरे फोडून एकूण साडे आठ तोळे सोन्याचे दागिने व तीन लाखाची रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Jalna Tirthpuri Robbery)

हे देखील पहा :

तीर्थपुरीतील (Tiithpuri) मुख्य बाजारपेठेला लागून असलेल्या खारामळ्यातील (Kharmala) एका कॉलनीत रविवारी पहाटे ३:३० ते ४ वाजेच्या सुमारास अज्ञात दहा ते बारा दरोडेखोरांनी अमोल काशीनाथ गवते यांच्या घराच्या बाहेरील दरवाज्याचा कडीकोंडा गजाच्या सहाय्याने तोडून घरात प्रवेश केला. घरात अमोल व त्याची पत्नी दोघेच झोपलेले होते. आईवडील व लहान भाऊ बाहेरगावी गेले असल्याने चोरट्यांनी दरवाजा आत ढकलताच अमोलला जाग आली तेव्हा अमोल दरोडेखोरांना प्रतिकार करत खिडकी उघडून आरडाओरड करण्याच्या प्रयत्न केला.

दरोडेखोरांनी (Robbers) अमोलच्या डोक्यात रॉड मारून पोटात चाकूचा जबर वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. चार ते पाच दरोडेखोरांनी अमोल व त्याच्या पत्नीला शास्त्राचा धाक दाखवत कपाटातील २ लाख ८७ हजार रुपये रोख व सोन्याची तीन तोळ्याचे दागिने असा ५ लाख ८७ हजारांचा मुद्देमाल घेऊन अमोल व पत्नीला बाथरूममध्ये कोंडून पळ काढला.

तर शेजारीच असलेल्या प्रवीण शिवाजीराव तांगडे यांच्या बंगल्याच्या बाहेर शोकेस म्हणून लावलेल्या भिंतीवरील काचेची खिडकी तोडून आत बेडरूममध्ये प्रवेश करून कपाटातील साड्या अस्ताव्यस्त करून नगदी १५ हजार रुपये रोख सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख ४० हजारांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला.

बाथरूममध्ये कोंडलेल्या अमोल गवते व त्यांच्या पती-पत्नी यांनी जोरजोरात आरडाओरड केल्याने शेजारी राहणाऱ्या जाग आल्याने त्यांनी त्यांची सुटका त्यांना उपचरासाठी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच गोदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या प्रकरणी तपास सुरू केला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक कामगार मलब्याखाली दबले

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

SCROLL FOR NEXT