महाराष्ट्र

नाद करा, पण 'बिजल्या'चा कुठं! शेतकऱ्यानं ११ लाखांना बैल विकला; घोड्यालाही घाम फोडणाऱ्या बिजल्याचा खुराक जाणून थक्क व्हाल

Bijlya bull :

Vishal Gangurde

जालन्यातील शेतकऱ्याने बिजल्या नावाचा बैल ११.११ लाख रुपयांना विकला

बिजल्या शंकर पटातील ताकदवान आणि शर्यतीत धावणारा बैल

बिजल्या बैलाच्या आहारात दूध, बदाम, डाळ आणि पौष्टिक खाद्य

काही दिवसांपूर्वीच ‘कॅप्टन’ नावाच्या बैलाची १६.५१ लाख रुपयांना विक्री

देशभरात बैलगाडी शर्यतीची क्रेझ वाढली आहे. देशभरात महागड्या बैलांना शर्यतीत उतरवलं जातंय. ही अनोखी शर्यत बघायला हजारोंची गर्दी पाहायला मिळते. महाराष्ट्रातील सातरा, सांगली भागासहित कोकणातही लाखोंचे बैल पाहायला मिळतात. शंकर पटात धावणारे हे बैल त्यांच्या मालकांना लाखोंची कमाई करून देतात. अशाच माध्यमातून जालन्यातील शेतकरी लखपती झाला आहे.

जालन्यात बैल विकून एक शेतकरी लखपती झाला आहे. जालन्यातील कानफोडी तांडा येथील पवन राठोड यांचा बिजल्या नावाचा बैल तब्बल 11 लाख 11 हजारांना विकला गेला आहे. सांगली जिल्ह्यातील कटरेवाडी येथील सागर कटरे यांनी हा बैल खरेदी केला आहे. घोड्यालाही घाम फोडणारा अशी बिजल्या बैलाची ओळख आहे. शंकर पटातला बैल असल्यानं बिजल्याला जास्तीची किंमत मिळाली आहे.

बिजल्याच्या आहारात काय असतं?

सकाळी 3 लिटर दूध, 100ग्रॅम बदाम, 1किलो उडीद डाळ, सायंकाळी रतीप खाद्य, मका भरडा, गहू भरडा, आहार देण्यात येतो. तसेच त्याला दर 2 दिवसांनी गरम पाण्याने पाणी आंघोळ घालण्यात येते.

कॅप्टनची १६ लाख ५१ हजार रुपयांना विक्री

काही दिवसांपूर्वी कॅप्टन नावाच्या बैलाची विक्री करण्यात आली होती. या बैलाच्या विक्रीतून मालकाला १६ लाख ५१ हजार रुपये मिळाले होते. छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड तालुक्यातील वाकी या गावातील कॅप्टनला मध्य प्रदेशातील बैतुल गावच्या पशुप्रेमीने विकत घेतला. हिंदकेसरी कॅप्टन बैलाची १६ लाखात विक्री झाल्यानं त्याची जोरदार चर्चा झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Case Live : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? युक्तिवादाला सुरूवात, पाहा क्षणाक्षणाचे अपडेट

Maharashtra News Live Update: पुणे विद्यापीठ कुलसचिवांच्या कार्यालयाच्या बाहेर अभाविप आक्रमक

Kidney Cancer: किडनीत कॅन्सरची गाठ तयार होण्यापूर्वी शरीरात दिसतात ही 6 लक्षणं

भाजप महिला मोर्चाच्या माजी प्रदेशाध्यक्षांचं निधन, राजकारणात शोककळा, मंत्री, आमदार निवासस्थानी दाखल

ठाण्यातील भाजपच्या बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, 'त्या' कारणामुळे पक्षाला केला रामराम; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT