Saam tv News - Saam Tv
महाराष्ट्र

Jalna Crime News: दारूच्या नशेत पतीनं उचललं टोकाचं पाऊल, गळा आवळून पत्नीची केली हत्या

Man Strangles Wife Alcohol Influence: दारूच्या नशेत पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना जालनामधील भाटेपुरी गावात घडली असून, आरोपी पतीला ताब्यात घेण्यात आलंय.

Bhagyashree Kamble

जालना: दारूच्या नशेत पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना जालनामधील भाटेपुरी गावात घडली आहे. कौटुंबिक वादातून पती आणि पत्नी दोघांमध्ये भांडणं झाली होती. रागाच्या भरात त्यानं पत्नीची गळा आवळून हत्या केली. असं पोलीस तपासात उघड झालं आहे. या प्रकरणी पती आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

दारू ही वाईट. दारूमुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या निगडीत आपण अनेक बातम्या ही पाहिल्या असतील. अशीच एक धक्कादायक घटना जालना तालुक्यातील भाटेपुरी येथे घडली आहे. दारूच्या नशेत पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

जालना तालुक्यातील भाटेपुरी गावात एक जोडपं राहत होतं. गजानन कावळे असं पतीचं नाव तर, पत्नी वंदना कावळे असं मृत पत्नीचं नाव आहे. दोघांचा संसार सुरू होता. पण नवऱ्याला दारूचं व्यसन होतं. दारूमुळे दोघांमध्ये वारंवार भांडणं होत. एकदा कौटुंबिक वादातून दोघांमध्ये टोकाचं भांडण झालं. याच टोकाच्या भांडणामुळे नवऱ्यानं बायकोची हत्या करण्याचं ठरवलं.

आरोपी पतीनं रागाच्या भरात पत्नीचा गळा जोरात आवळला. यादरम्यान पत्नीचा श्वास कोंडला गेला. ज्यामुळे पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मौजपूरी पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. तसेच आरोपी पतीला ताब्यात घेतलं असून, पोलीस निरीक्षक मिथुन घुगे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत. या प्रकरणानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस; शेतकऱ्यांना दिलासा

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT