Jalna News Crime Saam tv
महाराष्ट्र

जावयाचा सासरवाडीत आढळला मृतदेह; आत्‍महत्‍येचा बनाव करत हत्या केल्याचा नातेवाइकांचा आरोप

जावयाचा सासरवाडीत आढळला मृतदेह; आत्‍महत्‍येचा बनाव करत हत्‍याचा केल्‍याचा नातेवाईकांचा आरोप

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना : सासरवाडीला गेलेल्‍या जावयाचा गळफास लावलेल्‍या अवस्‍थेत मृत्यूदेह आढळून आला. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. परंतु, सदर इसमाची पत्नी, शालक आणि सासू सासऱ्यांनी मिळून हत्या करून (Suicide) आत्महत्येचा बनाव केल्याचा आरोप मृताच्‍या नातेवाईकांनी केला आहे. (Jalna Crime News)

जालना (Jalna) शहरातील इन्कमटॅक्स कॉलनी परिसरात एका विवाहित तरुणांचा गळफास लावलेल्या अवस्थेत मृत्यूदेह आढळून आला. यामुळे एकच खळबळ उडालीय. अमोल सपकाळ (रा. जळगाव, ता भोकरदन) असे मृतदेह आढळून आलेल्या तरुणाचे नाव असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृत्यूदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात (Hospital) पाठवला.

हत्‍या केल्‍याचा आरोप

अमोल सपकाळ यांच्या भावाने आणि वडिलांनी अमोल याची आत्महत्या नसून त्याचे व त्यांच्या पत्नीचे वाद असल्याने त्यांच्या पत्नीने व सासू सासऱ्यांनी त्यांची हत्या (Crime News) करून आत्महत्याचा बनाव केला असून ते फरार झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तसेच शवविच्छेदन औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात करण्याची मागणी करत अमोलच्या पत्नीसह तिचे आई, वडील व भावाला अटक करून हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नावात हे ३ अक्षर असलेली व्यक्ती आपल्या पत्नीला ठेवतात राणीसारखं; तुमच्या जोडीदाराचे नाव आहे का यात?

पाणीप्रश्नावरून पंचायत समिती कार्यालयात गोंधळ; उपसरपंचांच्या डोक्यावर महिलेने फेकला रिकामा हंडा

GenZ Fashion : 'कमी कपडे, जास्त लुक्स!' काय आहे Gen Z चा कैप्सूल वॉर्डरोब ट्रेंड?

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; अनेक पंपांवर ‘No Petrol, No Diesel’चे फलक

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

SCROLL FOR NEXT