जालना : मराठा आरक्षणासाठी १९ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याचे समोर आले होते. मात्र या घटनेबाबत (Police) पोलिसांनी तपास केला असता, धक्कादायक माहिती समोर आली असून ही (Jalna) आत्महत्या नसून खून करून आत्महत्या केल्याचा बनाव करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातल्या मुरमा गावामध्ये ही घटना घडली. यात १९ वर्षीय मुलाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली होती. दरम्यान या आत्महत्येच्या घटनेमध्ये खळबळ जनक खुलासा समोर आला आहे. ही आत्महत्या नसून मयत तरुण शिवप्रसाद थुटे याची स्वतःच्या बापानेच गळा दाबून हत्या केल्याचे उघडकीस आले. (Crime News) आरोपी महादेव थुटे याचा मयत मुलाबरोबर वाद झाला. या वादात त्याने मुलाची गळा दाबून हत्या केली. शिवाय ती आत्महत्या असल्याचे भासवून त्याचा मृतदेह घरातील पंख्याला लटकवला.
बापानेच लिहून ठेवली चिठ्ठी
याशिवाय आपण आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याची एक चिठ्ठी मुलाच्या नावाने लिहून ठेवली होती. दरम्यान पोलिसांना डॉक्टरांनी केलेल्या पीएम रिपोर्टच्या आधारे संशय आल्याने त्याचा व्हिसेरा तपासणीसाठी पाठवला होता. त्याचा अहवाल आल्यानंतर पोलिसांनीपोलिसी खाक्या दाखवताच आरोपी बापाने खून केल्याची कबुली दिली. यानंतर मुलाच्या खुनाच्या आरोपात बापाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.