Jalna Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News: घरातून निघून गेलेल्या मुलीचा जीव घेतला; निर्दयी बापाचं कृत्य असं आलं उघडकीस

जन्मदाता पिता व काकांची क्रुरता; झाडाला गळफास देत हत्या, मृत्यदेह जाळत परस्‍पर विल्‍हेवाट

लक्ष्मण सोळुंके

जालना : रागाच्या भरात घरातून निघून गेल्यानंतर पुन्हा तीन दिवसांनी घरी परतलेल्या १७ वर्षीय तरुणीला गळफास देऊन तिची जन्मदात्या पित्याने आणि काकाने हत्या (Crime News) केली. इतकेच नाही तर तिचा परस्पर मृत्यदेह जाळल्याची धक्कादायक घटना चंदणझिरा (Police) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळगाव शिवारात घडलीय. (Letest Marathi News)

सूर्यकला ऊर्फ सुरेखा संतोष सरोदे असे हत्या करण्यात आलेल्या १७ वर्षीय तरुणीचे नाव आहे. ती तीन दिवसांपूर्वी (Jalna News) रागाच्या भरात कुणाला काहीही न सांगता घरातून निघून गेली होती. त्यानंतर काल दुपारी ती पुन्हा घरी परतली. यानंतर तिच्या वडिलांनी जाब विचारत समाजात आमची बदनामी केली; असे म्हणत रागात तिला मारहाण करत भावाच्या मदतीने कडुलिंबाच्या झाडाला गळफास देऊन तिची (Crime) हत्या केली.

हत्या केल्यानंतर दोघा भावांनी तिचा मृत्यदेह रात्री परस्पर जाळून अंतविधीही केला. या घटनेची माहिती आज चंदणझिरा पोलिसांना कळताच त्यांनी घटनस्थळी धाव घेऊन वडील संतोष भाऊराव सरोदे, काका नामदेव भाऊराव सरोदे या दोघा भावांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता आपणच मुलीला गळफास देऊन हत्या केल्याची कबुली देत तिचा मृत्यूदेह जळल्याची ही कबुली दिली. यानंतर पोलिसांनी संतोष सरोदे व नामदेव सरोदे यांच्‍या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. या प्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक झलवार हे करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT