Jalna Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

Jalna : जालना हादरलं; रागाच्या भरात घर सोडून निघून गेलेल्या तरुणीसोबत वडील आणि काकाने केलं भयंकर कृत्य

जालन्यात रागाच्या भरात घरातून निघून गेलेल्या १७ वर्षीय तरुणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

लक्ष्मण सोळुंके

Jalna Crime News : जालन्यात रागाच्या भरात घरातून निघून गेलेल्या १७ वर्षीय तरुणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जन्मदात्या पित्याने आणि काकांनी कडुलिंबाच्या झाडाला गळफास देऊन हत्या केली आहे. जालन्यातील चंदणझिरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिरपिंपळगावतील घटना आहे. या घटनेने जालन्यात एकच खळबळ उडाली आहे. हत्येनंतर मृत्यदेहाची परस्पर जाळल्याची माहिती देखील समोर आली आहे. (Latest Marathi News)

रागाच्या भरात घरातून निघून गेल्यानंतर पुन्हा तीन दिवसांनी घरी परतलेल्या १७ वर्षीय तरुणीला गळफास देऊन तिची जन्मदात्या पित्याने आणि काकाने हत्या केल्याची घटना घडली आहे.

त्यानंतर तरुणीचा परस्पर मृत्यदेह जाळल्याची धक्कादायक घटना चंदणझिरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पीरपिंपळगावाच्या शिवारात घडली आहे. सूर्यकला ऊर्फ सुरेखा संतोष सरोदे असं हत्या करण्यात आलेल्या १७ वर्षीय तरुणीचे नाव आहे.

चार दिवसापूर्वी सुरेखा रागाच्या भरात घरातून निघून गेली होती. काल दुपारी सुरेखा आपल्या घरी परतल्या नंतर त्यांच्या वडिलांनी तिला जाब विचारत सामाजात आमची तुझ्यामुळे बदनामी झाली असं सांगत तिला मारहाण केली. त्यानंतर तिला काल, मंगळवारी सायंकाळी चार वाजणाच्या सुमारास आपल्या भावाच्या मदतीने कडूलिंबाच्या झाडाला गळफास देऊन हत्या केली. त्यानंतर रात्री तिचा परस्पर अंत्यसंस्कार ही केला.

या घटनेची माहिती मिळताच चंदणझिरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संतोष भाऊराव सरोदे (तरुणीचे वडील), नामदेव भाऊराव सरोदे (तरुणीचे काका) या दोघा भावांनी ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध मुलीला गळफास देऊन हत्या करून परस्पर मृत्यदेह जाळल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक झलवार हे तपास करत आहेत. या घटनेची माहिती कळताच जालना (Jalna) जिल्ह्यात एकच खबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli : सांगलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; सांगलीकरांची उडाली दैना

Pune Traffic : चाकण औद्योगिक क्षेत्रात वाहतुकीचा बोजवारा; पुणे-नाशिक महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

वर्ध्यात सुपरफास्ट एक्स्प्रेसवर दगडफेक; गार्डसह ३ ते ४ प्रवासी जखमी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भाचे, तरीही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Principal Bribery Case: मुख्याध्यापकाला अटक, लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडलं; नांदेडमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT