Jalna Crime News Saam tv
महाराष्ट्र

Jalna Crime News: मामाच्या मुलांनी केला आतेभावाचा खून; डुक्‍कर चोरून विकल्याचे कारण

मामाच्या मुलांनी केला आतेभावाचा खुन; डुक्‍कर चोरून विकल्याचे कारण

लक्ष्मण सोळुंके

जालना : मामाचा मुलगा डुक्कर चोरून घेऊन जात विक्री करत होता. याबाबत त्याला समजावून सांगून समज (Crime News) देण्यासाठी बसलेल्या बैठकीतच मामाच्या मुलाने आतेभावाच्या पोटात धारदार शस्त्राने वार करून खून केला. ही खळबळजळ घटना बदनापूर (Badalapur) शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात घडली. (Breaking Marathi News)

रमेश धोत्रे असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. आपल्याच मामाचा मुलगा राहुल डुकरे हा नातेवाईकांचे डुक्‍कर चोरून घेऊन जात विक्री करत असल्याने त्याला समज देण्यासाठी रमेश धोत्रे व त्याचा नातेवाईकांनी रेल्वे स्टेशन परिसरात बैठक बोलावली होती. या बैठकीदरम्यान राहुल डुकरे याला समज देत असताना रमेश धोत्रे आणि राहुल यांच्यात वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन भर बैठकीत राहुल डुकरेने रमेश धोत्रे यांच्या पोटात धारदार शस्त्राने वार केला. यात रमेश धोत्रेचा जागीच मृत्यू झाला.

तिघांविरुद्ध गुन्‍हा दाखल

घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून रमेश धोत्रे यांचा मृत्यूदेह शिवच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला. नातेवाईकांच्या तक्रारीवरून रमेश डुकरे यांच्यासह तिघांविरुद्ध खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरदिवसा झालेल्या या घटनेमुळे बदनापूर शहरासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईत गॅंगवॉर खपवूनन घेतला जाणार नाही- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

त्याने आमचं ऐकलं नाही; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर 'अनिल' नावाची पोस्ट व्हायरल

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

SCROLL FOR NEXT