Ambad Crime Saam tv
महाराष्ट्र

Ambad Crime : बँकेतून २ लाख ३० हजार रुपयांची बॅग लांबविली; अंबडच्या एसबीआय बँकेतील घटना

Jalna News : रक्कम भरण्यासाठी कॅश काउंटरजवळ पैसे भरत असताना बाजूला ठेवलेली दोन लाख तीस हजार रुपयांची बॅक दोन अज्ञात चोरट्यांनी बँकेतून चोरून नेली आहे काही वेळानंतर रक्कम ठेवलेली पिशवी गायब असल्याचे निदर्शनास आले

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 
जालना
: स्टेट बँकेच्या अंबड शाखेतून भर दिवसा कॅश काउंटरवरून रोकड ठेवलेली पिशवी चोरट्याने लांबविली आहे. या पिशवीत साधारण २ लाख ३० हजार रुपयांची रक्कम होती. संपूर्ण घटना बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून रोकड लांबविल्याचे लक्षात आल्यानंतर या प्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जालन्यातील अंबड येथील स्टेट बँकेत सदरची घटना घडली आहे. यात बँकेत २ लाख ३० हजार रुपयांची रक्कम भरणा करण्यासाठी एकजण आला होता. हि रक्कम एका पिशवीत ठेवलेली होती. रक्कम भरण्यासाठी कॅश काउंटरजवळ उभे असताना पैसे भरत असताना बाजूला ठेवलेली दोन लाख तीस हजार रुपयांची बॅक दोन अज्ञात चोरट्यांनी बँकेतून चोरून नेली आहे. दरम्यान काही वेळानंतर रक्कम ठेवलेली पिशवी गायब असल्याचे निदर्शनास आले. 

चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद 

अंबड येथील एसबीआय बँकेत काल दुपारच्या सुमारास ही घटना घडली असून चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी रामेश्वर बारहाते यांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात चोरट्यांविरोधात जालन्यातील अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत.

सराफ दुकानातुन १ लाख ६८ हजाराचे दागिने चोरी
धाराशिव
: धाराशिवच्या लोहारा तालुक्यातील आष्टाकासार येथे सराफ दुकानातुन एक लाख ६८ हजार रुपयांचे सोने- चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली. ही चोरी करताना चोरटे सिसिटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या प्रकरणी मुरूम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावातील सुनिल महादेव कोकणे यांचे गावातच भाग्यलक्ष्मी ज्वेलर्स दुकान आहे. या दुकानात चोरी झाल्याची घटना घडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

Om Namah Shivaya Mantra Benefits: रोज १०८ वेळा ॐ नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतो?

Chandrashekhar Bawankule : ओबीसींना आता १ रुपयात जमीन मिळणार! चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय, सर्व विभागांना आदेश; पाहा सविस्तर

Maharashtra News Live Update: पश्चिम विदर्भातील 56 तालुक्यात दुष्काळ जाहीर

Pune Fort : पुण्याजवळ दडलाय इतिहासाचा खजिना! दोन डोंगरांवर वसलाय भव्य किल्ला

SCROLL FOR NEXT