Jalna Crime Saam tv
महाराष्ट्र

Jalna Crime : अर्जुन खोतकरांच्या कार्यकर्त्यांची हत्या; जालना शहरात खळबळ

Jalna News : हत्या प्रॉपर्टी वादातून असलेल्या पूर्ववैमनस्यातून झाल्याची चर्चा शहरभर सुरु आहे. या प्रकारणी पोलिसांनी पथक स्थापन करुन आरोपीचा शोध सुरु केला

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालना शहरातील मंठा चौफुली भागात गोळीबाराची घटना दुपारच्या सुमारास घडली. अर्जुन खोतकर यांचा खंदा समर्थक असलेल्या गजानन तौर या कार्यकर्त्यावर गोळ्या (Jalna) झाडण्यात आल्या (Crime News) असून यात दोन गोळ्या लागल्याने तौर यांचा मृत्यू झाला. प्रॉपर्टीच्या सुरु असलेल्या वादातून हत्या झाल्याची चर्चा शहरभर सुरु आहे. (Tajya Batmya)

जालना येथील गजानन तौर हे रामनगर कारखान्याकडून जालनाकडे त्यांच्या चारचाकी वाहनाने निघाले होते. यावेळी पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या तीन जणांनी तौर यांच्या दिशेने गावठी पिस्तूलातून चार गोळ्या झाडल्या. यात दोन गोळ्या तौर यांना लागल्या. तर दोन गोळ्या चाटून गेल्या (Police) होत्या. त्यात तौर गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी तौर याला तपासले असता मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. नंतर शहरात एकच खळबळ उडाली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांकडून तपस सुरु 

सदर घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासह पोलिसाच्या पाथकांनी आरोपीचा शोध सुरु केला आहे. तर तौर यांच्यावर इन कॅमेरा शवविच्छेद करण्याची मागणी करण्यात आल्याने मृतदेह छत्रपती संभाजीनगर शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. गजानन तौर हा अर्जुन खोतकर यांचा खंदा समर्थक असल्याने अनेक सामाजिक कार्यातही त्याचा सहभाग होता. यापूर्वी ही तौर यांच्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार केल्याचा गुन्हा सुद्धा दाखल आहे. ही हत्या प्रॉपर्टी वादातून असलेल्या पूर्ववैमनस्यातून झाल्याची चर्चा शहरभर सुरु आहे. या प्रकारणी पोलिसांनी पथक स्थापन करुन आरोपीचा शोध सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT