21 year old youth burnt alive  SaamTV
महाराष्ट्र

Jalna Crime : २१ वर्षीय तरुणाला जिवंत जाळलं, गावाच्या गायरान भागात फेकलं; मृतदेह बघून जालन्यात खळबळ

Jalna Crime News : या घटनेतील आरोपीस शोधून त्याला जेरबंद करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी मयत आकाश जाधव याच्या नातेवाईकांनी केलीय.

Prashant Patil

जालना : जालन्यात एका २१ वर्षीय तरुणाला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जालन्यातील बदनापूर तालुक्यातील मेहुना गावात ही धक्कादायक घटना घडली आहे .या घटनेने बदनापूर तालुक्यासह जालना जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. आकाश जाधव असं मयत तरुणाचं नाव आहे.

आज दुपारच्या सुमारास त्याचा मृतदेह गावातील गायरान जमिनीमध्ये जळालेल्या अवस्थेत मिळून आलाय. दरम्यान, या तरुणाला कोणी जाळलं, कशासाठी जाळलं? याची माहिती अद्याप समोर येऊ शकलेली नाही. घटना उघडकीस आल्यानंतर जालन्याचे पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. या घटनेतील आरोपीस शोधून त्याला जेरबंद करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी मयत आकाश जाधव याच्या नातेवाईकांनी केलीय.

दरम्यान, वर्ध्यामध्ये देखील हत्येची एक धक्कादायक घटना घडली आहे. इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केल्याच्या वादातून दोन भावंडांनी १७ वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून खून केला. ही घटना हिंगणघाट तालुक्यातील पिंपळगाव (माथनकर) येथे घडली. हिमांशू किशोर चिमणे (वय १७ वर्ष, रा. संत कबीर वार्ड हिंगणघाट) असं मृत मुलाचं नाव आहे. या प्रकरणी तक्रारीवरून मानव धनराज जुगनाके (वय २१) आणि अनिकेत धनराज जुगनाके (वय २३) या दोन्ही भावांवर हिंगणघाट पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: बीड जिल्ह्यात शेतकरी दुहेरी संकटात गतवर्षी ओला दुष्काळ तर यावर्षी कोरडा दुष्काळ

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

Sea Water : पाण्याला रंग नसतो, मग समुद्राचं पाणी निळे का असते?

SCROLL FOR NEXT