"मला आमदार झाल्यासारखं वाटतंय" गाण्यावर आमदाराने धरला ठेका! Video होतोय व्हायरल SaamTVnews
महाराष्ट्र

"मला आमदार झाल्यासारखं वाटतंय" गाण्यावर आमदाराने धरला ठेका! Video होतोय व्हायरल

विधानसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले होते. यामध्ये आमदार नारायण कुचे यांचा देखील समावेश होता.

लक्ष्मण सोळुंके

जालना : बदनापूर विधानसभा मतदार संघाचे भाजपा आमदार नारायण कुचे यांचा "जेव्हा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय" या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ मध्ये आमदार आपल्या नातेवाईकाच्या मुलीच्या लग्नात डान्स करताना दिसत आहेत.

हे लग्न औरंगाबाद (Aurangabad) शहरातली पंचतारांकित हॉटेल मध्ये चार ते पाच दिवसांपूर्वी झाल्याची माहिती समोर येत असून हळदी समारंभाच्या वेळी हा डान्स आमदार नारायण कुचे (MLA Narayan Kuche) यांनी केला असल्याचं समोर आले आहे. विधानसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले होते. यामध्ये आमदार कुचे यांचा देखील समावेश होता.

आमदार नारायण कुचे यांनी भाजपच्या (BJP) इतर आमदारांसोबत विधानसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी निलंबन करण्यात आले होते. निलंबित आमदार असलेल्या नारायण कुचे यांनी "जेव्हा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय" या गाण्यावर डान्स (Dance) केल्याने, सोशल मीडियावर डान्सची चांगलीच चर्चा रंगली आहे. पक्षातील कार्यकर्त्यांसह विरोधी गटातील कार्यकर्त्यांनी ही हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करायला सुरुवात केल्याने निलंबित आमदाराच्या या व्हिडिओ (Video) ची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: DM सोबतच्या ऑनलाईन मिटिंगमध्ये अचानक प्ले झाला पॉर्न VIDEO, पाहताच महिला अधिकारी पळून गेल्या

Maharashtra Live News Update: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेवरून नवा वाद

Dengue : गडचिरोलीत डेंग्यूचा कहर; महिलेसह दोन जणांचा मृत्यू, मुलचेरा तालुक्यात ६६ रुग्ण

Ovarian cancer: अंडाशयाच्या कॅन्सरचं मूळ कारण तज्ज्ञांनी काढलं शोधून; आता गंभीर आजार होण्यापूर्वीच मिळू शकणार उपचार

Mhada Home Price: खुशखबर! म्हाडाच्या घरांच्या किंमती आणखी कमी होणार; सरकारच्या नेमका प्लान काय?

SCROLL FOR NEXT