Accident News Saam tv
महाराष्ट्र

Jalna Accident News: शीतपेयाच्या गाडीला उडविले; अपघातात विक्रेत्‍याचा जागीच मृत्‍यू

Jalna accident with soft drink cart: शितपेयच्‍या गाडीला उडविले; अपघातात थंडपेय विक्रेत्‍याचा जागीच मृत्‍यू

लक्ष्मण सोळुंके

जालना : उन्‍हाची तिव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे आता रस्‍त्‍याच्‍या दोन्‍ही बाजूला शीतपेय विक्रीच्‍या गाड्या लागलेल्‍या आहे. यात (Jalna) जालन्यात रस्‍त्‍याच्‍या कडेला लागलेल्‍या शीतपेय विकणाऱ्या हातगाडीसह विक्रेत्याला अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना घडली आहे. यात विक्रेत्‍याचा (Accident) जागीच मृत्‍यू झाला आहे. (Live Marathi News)

जालना- छत्रपती संभाजीनगर मार्गावर रस्त्याच्या कडेला शीतपेय विकणाऱ्या हातगाडी लागलेली होती. या गाडीसह विक्रेत्याला अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना जालन्यात एसटी महामंडळाच्या वर्कशॉप समोर घडलीय. या अपघातात विक्रेता तरुण जागीच ठार झाला आहे. राहुल बनसोडे असे या थंडपेय विक्रेत्यांचा नावं असून या घटनेची माहिती मिळताच चंडांझिरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या अज्ञात वाहनाचा शोध सुरू केला आहे.

रोजीरोटीसाठी सुरू केली गाडी

राहुल बनसोडे याने उन्‍हाळा सुरू झाल्‍याने आपल्‍या रोजीरोटीसाठी थंडपेय विक्रीची हातगाडी लावली होती. यातून दिवसभरात मिळत असलेल्‍या पैशातून कुटूंबाला हातभार लावत होता. परंतु, त्‍याच्‍या मृत्‍यू झाल्‍याने कुटूंबाचा आधार गेला आहे. दरम्यान या अपघाताची माहिती कळताच चंदनझिरा परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT