Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News: एकाच बाईकवर चौघांची सवारी ठरली जीवघेणी; देवदर्शनाहून परतताना दोघांचा मृत्यू

एकाच बाईकवर चौघांची सवारी ठरली जीवघेणी; गणपती दर्शने घेवून परतताना अपघातात दोघांचा मृत्यू

लक्ष्मण सोळुंके

जालना : श्रीक्षेत्र राजुर गणपती येथून गणेशाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भोकरदन शहरातील तरुणांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. या अपघातात (Accident) दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत.

त्यांना औरंगाबाद (Aurangabad) येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे शहरातील हे चौघेही तरुण गणपतीच्या दर्शनासाठी एकाच मोटरसायकलवर गेले होते. (Maharashtra News)

अंगारिका चतुर्थी असल्याने भोकरदन शहरातील चौघे तरुण एकाच दुचाकीवर दर्शनासाठी गेले होते. मध्यरात्री दर्शन झाल्यानंतर भोकरदनकडे (Jalna News) येत असताना पहाटे ४ वाजेच्या दरम्यान त्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला.

या अपघातात भोकरदन येथील फत्तेपूर रस्त्यावरील निलेश हिरालाल चव्हाण (वय २०), प्रशांत आरके (वय २१) हे दोन तरुण जागीच ठार झाले. तर अनिकेत बाळू वाहुळे (वय १९) आणि आरेफ सलीम कुरेशी (वय २२) हे दोन तरुण गंभीर जखमी झाले.

दोघांची प्रकृती गंभीर

घटनेची माहिती मिळताच हसनाबाद पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. अपघात स्थळावरून तरुणांना राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टटरांनी तपासून प्रशांत व निलेश याला मृत घोषित केले.

तर अनिकेत वाहूळे व आरेफ कुरेशी यांच्यावर प्राथमिक औषध उपचार करून जालना येथे हलविले. मात्र दोघेही गंभीर जखमी असल्याने त्यांना औरंगाबाद येथे हलविण्यात आले. या प्रकरणात राजूर पोलिस चोकीत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये अज्ञात व्यक्तीने तोडले शेकडो झाडे

India vs Pakistan : पाकिस्तानची पुन्हा फटफजिती! आशिया कप जिंकल्यानंतर भारतीय महिला संघाचा नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार

10 IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; महत्वाच्या शहरातील पोलीस आयुक्त बदलले, कोणाची कुठे नियुक्ती?

Kalyan Traffic Update : कल्याणमध्ये वाहतुकीत मोठा बदल! 'या' मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Vastu Tips: घराच्या नेमप्लेटमध्ये दडलंय यशाचं रहस्य, लाकडी- दगडाची की धातूची; कोणती असते शुभ?

SCROLL FOR NEXT