Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News: दुर्देवी..मकरसंक्रांतीला घरी जाताना‍या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू; मुलगा गंभीर, बैलगाडी– स्कुटीचा अपघात

दुर्देवी..मकरसंक्रांतीला घरी जाताना‍या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू; मुलगा गंभीर, बैलगाडी– स्कुटीचा अपघात

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालना पोलिस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेल्या महिला पोलिस शिपाई सुनीता ईश्वरसिंग ढोबाळ या मुलासह मकरसंक्रांत सणानिमित्त इब्राहिमपूर (ता. भोकरदन) या मूळ गावी जात होत्‍या. या दरम्‍यान त्यांच्या स्कुटीचा आणि बैलगाडीत अपघात (Accident) झाल्याने यात त्यांचा दुर्देवी मृत्यु झाल्याची घटना घडली. (Letest Marathi News)

राजूर- भोकरदन महामार्गावरील हॉटेल हरिद्वार समोर सदर अपघात घडला. पोलिस शिपाई सुनीता ईश्वरसिंग ढोबाळ या आपल्या मुलासह मकरसंक्रांत सणानिमित्त इब्राहिमपूर गावी जात होत्‍या. त्यांचा मुलगा स्कुटी चालवत असताना सामोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज न आल्याने त्यांची स्कुटी रस्त्याने जाणाऱ्या बैलगाडीवर जाऊन जोरदार आदळली. या अपघात त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला.

जखमी मुलगा रुग्णालयात

स्‍कुटी चालवत असलेला त्‍यांचा मुलगा गंभीर जखमी झाल्याने परिसरातील नागरिकांनी त्याला उपचरासाठी रुग्णालयात हलविले आहे. या घटनेची माहिती पोलिस अधिक्षक कार्यालयात कळताच हळहळ व्यक्त केली जात आहे. तर त्यांच्‍या इब्राहिमपूर गावात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच राजूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाताचा पंचनामा करत घटनेची नोंद पोलिस डायरीत करत या प्रकरणी पंचनामा ही केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : नाशिक विधानपरिषद निवडणुकीत गोकुळ गीते यांचा विजय

Crime : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याचा हाफ एन्काउंटर, पोलिसांनी दोन्ही पायांवर झाडल्या गोळ्या

Baba Bhide Bridge : पुण्यातील बाबा भिडे पूल ६ जुलैपर्यंत राहणार बंद, नेमकं कारण काय?

Vidhan Parishad Result 2026: महायुतीचा दणदणीत विजय, मविआची मते फुटली; सर्व १७ जागांचा संपूर्ण निकाल एकाच क्लिकवर

Weekly Horoscope: या राशींना जुन्या गुंतवणूकीतून फायदा होणार आहे, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

SCROLL FOR NEXT