JALNA GST OFFICER AND TAX CONSULTANT ARRESTED IN ₹60,000 BRIBERY CASE BY ACB Saam Tv
महाराष्ट्र

Bribe Case : जालन्यात खळबळ! अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले; असे अडकले जाळ्यात

Jalna Bribe Case News : जालन्यात इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) अनब्लॉक करण्यासाठी ६० हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला जीएसटी अधिकारी सुवर्णा लोहिया आणि कर सल्लागार अक्षय जैन यांना एसीबीने रंगेहाथ अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • जालन्यात महिला जीएसटी अधिकारी आणि कर सल्लागाराला ६० हजारांची लाच स्वीकारली

  • तक्रारदाराचे इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) अनब्लॉक करण्यासाठी लाचेची मागणी

  • एसीबीने सापळा रचून दोघांना रंगेहाथ पकडले

  • या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

अक्षय शिंदे पाटील, जालना प्रतिनिधी

जालन्यातून मोठी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यात ACB ने कारवाई करत GST विभागातील महिला राज्य कर अधिकारी आणि एका खासगी कर सल्लागाराला ६० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरु केला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये सुवर्णा लोहिया , तसेच अक्षय जैन (लोढा), यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिकाचे इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) अनब्लॉक करण्यासाठी सुरुवातीला एक लाख रुपयांची लाच मागण्यात आल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती. पडताळणीदरम्यान १७ जुलै रोजी तक्रारदार जीएसटी कार्यालयात गेला असता, सुवर्णा लोहिया यांनी कॅल्क्युलेटरवर ८० हजार रुपयांचा आकडा दाखवत लाचेची मागणी केली.

यावेळी उपस्थित असलेल्या खासगी कर सल्लागार अक्षय जैन यानेही तक्रारदाराला लाच देण्यासाठी सांगितले. याप्रकरणी संबंधित व्यक्तीने पोलीस ठाण्यात धाव घेतली असता पोलिसांनी गुन्हा नोंदवून दिलेली माहिती पडतळाणीसाठी एसीबीने सापळा रचला. २८ जुलै रोजी तक्रारदाराकडून ६० हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर लोहिया यांनी ती रक्कम आपल्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवली.

ठरलेल्या इशाऱ्यानंतर एसीबीच्या पथकाने तत्काळ धाड टाकून सुवर्णा लोहिया आणि अक्षय जैन या दोघांना ताब्यात घेतले. ही कारवाई एसीबीचे उपअधीक्षक बाळू जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दोन्ही आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले असून, त्यातून आणखी कोणते व्यवहार किंवा पुरावे समोर येतात का, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणामुळे जीएसटी विभागातील कामकाजाच्या पारदर्शकतेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kangana Ranaut: 'तू विद्यार्थी नाही, बेकार आहेस'; कंगना रणौतचा सौरव दासवर पलटवार

Maharashtra News Live Update: पिंपरी मार्केटमध्ये मोबाईल चोरीची घटना; चोराचा कारनामा कॅमेऱ्यात कैद

Rahul Gandhi: 'विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त...'; पेपर लीकप्रकरणावरून राहुल गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत नव्या शेतकऱ्यांनी अर्ज कसा करावा? जाणून आवश्यक कागदपत्रे आणि संपूर्ण प्रक्रिया

छातीत वारंवार दुखत असेल तर अजिबात दुर्लक्ष करू नका; हा असू शकतो हार्ट अटॅकचा धोका

SCROLL FOR NEXT