अमळनेर (जळगाव) : मद्यधुंद नवऱ्याच्या जाचाला कंटाळून मुलांसह महिला आत्महत्या करायला निघाली होती. परंतु या महिलेला ११२ च्या कॉलमुळे पोलिसांचा (Police) आधार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचून सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (jalgoan news woman was going to commit suicide with her children Call 112 got support)
अटाळे (ता.अमळनेर) येथील स्वप्नील विठ्ठल पाटील हा पत्नी सोनाबाई पाटील (वय ३१) हिच्याकडे २१ रोजी दारू पिण्यासाठी पैसे मागत होता. पैसे मिळाले नाही म्हणून त्याला राग आला. रागाच्या भरात सोनाबाईला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच १० वर्षाचा मुलगा आदित्य व चार वर्षांची मुलगी योगिता हिलापण मारहाण (Crime News) केली. वारंवार होणाऱ्या या घटनेची चीड येऊन सहनशीलतेचा अंत झाला. त्याचवेळी दिर सागर पाटील, सासू पुष्पाबाई पाटील, नणंद वैशाली भागवत पाटील यांनीही शिवीगाळ करून तुला बघून घेऊ अशी धमकी दिली.
पोलिसात जाताना फिरविले माघारी
सोनाबाई पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी रिक्षावर जात होती. मात्र तिच्या पतीने रिक्षात बसू दिले नाही आणि रिक्षा परत पाठवली. (Jalgaon News) म्हणून सोनाबाईने पायी रस्ता धरून रस्त्यात एका विहिरीत दोन्ही मुलांसह आत्महत्येचा निर्णय घेतला. तेथील एका व्यक्तीने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु महिला ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. अखेर महिला दोन मुलांसह आत्महत्या करीत असल्याचा ११२ ला कॉल गेला.
अखेर पोलिसात गुन्हा
पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी ताबडतोब दीपक माळी व रवींद्र पाटील या पोलिसांना घटनास्थळी पाठवले. काही ग्रामस्थांनी तिला थोपवून धरले होते. दोन्ही पोलिसांनी तिचे मन परिवर्तन करून तिला पोलिसात तक्रार देण्याचा सल्ला दिला व तिला सोबत पोलीस स्टेशनला आणले. कौटुंबिक बाब असल्याने महिलेच्या तक्रारीवरून दारुड्या पती, दिर, सासू, नणंद यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ११२ च्या सुविधेमुळे महिलेचे प्राण वाचले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.