Chalisgaon Crime
Chalisgaon Crime Saam tv
महाराष्ट्र

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; चाळीसगावमधील संतापजनक घटना

साम टिव्ही ब्युरो

चाळीसगाव (जळगाव) : तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारातून ती गर्भवती झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीसात (Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (jalgoan news crime girl torture case Filed a case with Chalisgaon Police)

चाळीसगाव (Chalisgaon) तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत फुस लावून पळवून नेले. तब्बल साडे सहा महिने शारीरिक संबंध ठेवत अत्याचार केला. यातून ती मुलगी गर्भवती झाल्याचे गंभीर प्रकार २१ मे रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीला आला आहे. भगवान (रा. चांभार्डी बु. ता. चाळीसगाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे. दरम्यान पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात पोस्को अंतर्गत ४, ६, ८, १२ अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि धरमसिंग सुंदरडे हे करीत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut | कशाचा शोध घेतायत संजय राऊत?

Avinash Jadhav: खंडणीच्या आरोपानंतर अविनाश जाधवांची पहिली प्रतिक्रिया

Raveena Tandon: रविनाचा हवाहवाई लूक; पाहा फोटो..

Prakash Ambedkar Pune | प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान!

Today's Marathi News Live: अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणी मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT