Jalgaon zp News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: धरणगावनंतर जळगाव तालुक्यातील दोन ग्रामसेवक निलंबित

धरणगावनंतर जळगाव तालुक्यातील दोन ग्रामसेवक निलंबित

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : जळगाव तालुक्यात घरकुल योजना व स्वच्छ भारत अभियानात उदिष्ट पूर्ती न करणाऱ्या जळगाव (Jalgaon) तालुक्यातील दोन ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई केली आहे. याबाबतचे आदेश जिल्‍हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया (Pankaj Aashiya) यांनी काढले आहेत. (Jalgaon Zilha Parishad News)

जळगाव (Jalgaon ZP) तालुक्यातील विविध योजनांच्या बाबतीत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्‍या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व समावेशक आढावा घेतला. यावेळी घरकुल योजना व स्वछ भारत अभियान या योजनांमध्ये उद्दिष्टापेक्षा कमी काम करणाऱ्या जळगाव तालुक्यातील उमाळे येथील ग्रामसेवक किरण कल्याण लंके, तसेच धानवड येथील ग्रामसेवक सुनील विठ्ठल चौधरी यांचेवर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

अगोदर धरणगाव तालुक्‍यात कारवाई

गुरुवार (25 ऑगस्‍ट) धरणगाव पंचायत समिती येथे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत याच कारणासाठी दोघा ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच या आढावा बैठकीत विविध मुद्द्यावर आढावा घेताना दप्तरात अपूर्णता असलेल्या ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांचे सखोल दप्तर तपासण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. आता घरकुल योजना व स्वच्छ भारत योजनेतील कामावरून जळगाव तालुक्‍यात कारवाई झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Happy Married Life Tips: नवरा-बायकोमधील सततची भांडणे मिटवण्यासाठी ‘या’ ५ सोप्या गोष्टींची मदत घ्या; संसारात राहील गोडवा

BP अचानक वाढतोय? सकाळी ही 6 पेये ठरतील फायदेशीर

Ration Card : रेशन कार्डवर PHH की AAY? तुमच्या कुटुंबाला महिन्याला किती किलो धान्य मिळणार, लगेच तपासा

Maharashtra News Live Update: गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई, 22 लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त

Dates vs Raisins : खजूर की मनुका, दोघांपैकी काय आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशीर

SCROLL FOR NEXT