Dengue Disease Saam tv
महाराष्ट्र

Dengue Disease: वरणगावात बारा वर्षीय मुलाचा डेंग्यूने मृत्यू

Jalgaon News : वरणगावात बारा वर्षीय मुलाचा डेंग्यूने मृत्यू

संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव

भुसावळ (जळगाव) : जळगाव जिल्ह्यात डेंग्यूची साथ पसरत आहे. डेंग्यूची (Dengue) लागण अनेकांना झाली असून मागील आठवड्यात (Chalisgaon) चाळीसगावमध्ये एका मुलाचा मृत्यू झाला होता. यानंतर आता वरणगावमध्ये एका बारा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. (Live Marathi News)

डेंग्यूची साथ सर्वत्र पसरली आहे. जळगाव जिल्ह्यात देखील अनेकांना डेंग्यूची लागण झाली आहे. या दरम्यान भुसावळ तालुक्यातील अंतुर्ली येथील रहिवासी अर्णव विशाल कुलकर्णी (वय १२) हा  वरणगांव (Varangaon) येथे आजीकडे राहून शिक्षण घेत होता. त्याला डेंग्यु आजार झाल्याने भुसावळ येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या शरीरातील पेशी कमी झाल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला आहे.

आरोग्य विभाग अलर्ट 

चाळीसगावनंतर भुसावळ तालुक्यातील वरणगांव येथे बारा वर्षीय मुलाचा डेंग्यु आजाराने मृत्यु झाल्याने खळबळ उडाली आहे. यानंतर आरोग्य विभाग अर्लट झाला आहे. या अनुषंगाने वरणगांव लगत असलेल्या कठोरा आरोग्य केंद्रात साथीरोग समुपदेशन कार्यक्रम घेण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अमेरिकेत पुराचा हाहाकार! 50 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: पंढरपुरात जूनी इमारत कोसळली

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

Valheri Waterfall: मुसळधार पावसामुळे वाल्हेरी धबधब्याचे सौंदर्य खुलले; पर्यटकांची प्रचंड गर्दी| VIDEO

Muharram : मोहरमच्या आनंदावर विरजण, आगीत हनुमंतचा मृत्यू; काळजात धस्स करणारी घटना

SCROLL FOR NEXT