SBI bank robbery in Bhokar village Jalgaon district saam tv
महाराष्ट्र

Jalgaon SBI Bank Robbery: भरदिवसा स्टेट बँकेवर सशस्त्र दरोडा; तब्बल 30 कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास, आरोपींना सिनेस्टाईलने पकडलं

Jalgaon SBI Robbery : जळगाव जिल्ह्यातील भोकर गावात असलेल्या एसबीआय (SBI) शाखेत सशस्त्र दरोड्याची एक धक्कादायक घटना घडली. दरोडेखोर ३० कोटी रुपयांचे सोने आणि १२ लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, पोलीस आणि ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडलंय.

Bharat Jadhav

  • जळगाव जिल्ह्यातील भोकर गावात स्टेट बँकेवर सशस्त्र दरोडा

  • स्टेट बँकेतून 30 कोटींचे सोने आणि 12 लाखांची रोकड लंपास

  • दरोडेखोरांनी बँक कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप

जळगाव जिल्ह्यातील भोकर येथील स्टेट बँकेच्या शाखेत सशस्त्र दरोडा पडल्याची घटना घडलीय. शस्त्राचा धाक दाखवत चोरांनी भरदिवसा दरोडा घातला. चोरट्यांनी कोट्यावधी रुपयांची रोकड सोने लंपास केली होती. या घटनेमुळं मोठी खळबळ उडालीय. याप्रकरणी पोलीस आणि गावकऱ्यांच्या मदतीने तीन आरोपींना अटक देखील करण्यात आलीय.

जळगाव जिल्ह्यात भोकर गावातील स्टेट बँकेवर दरोडा घालत दरोडेखोरांनी तब्बल 30 कोटी रुपयांचे सोने आणि 12 लाखांची रोकड लंपास केली होती. दरोडेखोरांनी बँक कर्मचाऱ्यांना मारहाण केली. बंदुकीतून गोळीबार करत बँकेतील रक्कम चोरली. दरोडेखोर सोने आणि रोकड घेऊन पळून जाताना बँक कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थ आणि पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना पकडलं.

चार दरोडेखोरांना मुद्देमालासह अटक करण्यात यश मिळविलंय. दरम्यान दरोडा झालेल्या बँकेत मंत्री गुलाबराव पाटील यांनी पाहणी केलीय. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी तीन आरोपींना जेरबंद केले आहे. तरी आणखी काही दरोडेखोर फरार झाले आहेत. फरार झालेल्या आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. ज्या आरोपींना अटक करण्यात आली आहे, त्यांची पोलीस कसून चौकशी करत आहेत.

जळगाव तालुक्यातील भोकर येथे दुपारी तीन वाजेच्या सुमारास स्टेट बँकेच्या शाखेत काही दरोडेखोर शिरले. त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवून रोकड लुटली. काही क्षणांमध्येच त्यांनी रोकडसह तेथून पलायन केलं दरम्यान या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग केला. काही वेळानंतर यातील एक आरोपी हा विदगावजवळ मिळून आल्याने लोकांनी त्याला मार देत पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी रोकडसह बॅगाही पोलिसांनी हस्तगत केल्या. या घटनेचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत.

या प्रकरणी माहिती देताना श्रीकांत देवरे पोलीस अधीक्षक म्हणाले की, याप्रकरणी अजूनही गुन्हा दाखल करण्यात आला नाहीये. दरम्या भोकर येथील एसबीआयच्या शाखेत चार जणांना सशस्त्र दरोडा घातला. चोरांनी किती सोनं लंपास केलं याची तपासी अद्याप सुरूय. चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडून चार बॅग्सदेखील जप्त केल्या आहेत. त्यांची चौकशी केल्यानंतर पोलिसांकडून प्रेस नोट काढून त्यांच्या नावासह सर्व माहिती देण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सेवानिवृत्तीच्या 2 दिवस आयुक्त ACBच्या जाळ्यात; लाचखोर आयुक्तापेक्षा PA कडे जास्त घबाड

चौदाशे वर्षांची श्रद्धापरंपरा, आधुनिकतेचा नवा अध्याय; गोदामाईच्या साक्षीने श्रद्धेचा महासंगम, पाहा PHOTOS

संजय राऊत बाळासाहेब ठाकरेंना आवडायचे नाहीत! राज ठाकरेंनी संगितला मुलाखतीचा किस्सा

विधानपरिषदेतील पराभवानंतर महायुतीत 'महाभारत', बन विरुद्ध धंगेकर वाद पेटला; महायुतीच्या चिंतन बैठकीआधीच राडा

Garuda Purana: १६ संस्कारांचे ज्ञान तरीही लोक नाव ऐकताच गरुड पुराणाला का घाबरतात?

SCROLL FOR NEXT