Lightning Strike Saam tv
महाराष्ट्र

Lightning Strike : शेतात गेलेल्या महिलेचा वीज पडून मृत्यू; शेतातून परतताना घडली घटना

Jalgaon News : शेतमजुरी करून कुटुंबाला हातभार लावत होत्या. रोज शेतात जाऊन मजुरीचे काम करत होत्या

Rajesh Sonwane

रावेर (जळगाव) ; शेतात कामासाठी गेलेली महिला दिवसभर काम करून घरी परतत असताना त्यांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सदरची घटना रावेर तालुक्यातील शिंगाडी गाव शिवारात घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे. 

रावेर (Raver) तालुक्यातील शिंगाडी येथील जुलेखा बी हैदर शा फकीर (वय ३५) असे मृत महिलेचे नाव आहे. जुलेखा बी या शेतमजुरी करून कुटुंबाला हातभार लावत होत्या. रोज शेतात जाऊन मजुरीचे काम करत होत्या. रोजप्रमाणे त्या गावातील महिलांसोबीत नेहमी प्रमाणे शेत मजुरी कामासाठी शेतात कामावर गेल्या होत्या. दुपारपर्यंत काम केल्यानंतर सर्व महिला घरी जाण्यासाठी निघाल्या. याचवेळी ढगाळ वातावरण होऊन विजा देखील चमकत होत्या. 

दरम्यान काम आटोपल्यानंतर घरी परत येताना शिंगाडी गाव शिवारात शैलेंद्र सोपान पाटील यांच्या शेतातून जात असताना अचानक त्यांच्या आंगवर (Lightning Strike) वीज पडली. यानंतर त्यांना जखमी अवस्थेत ऐनपुर येथे खासगी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी प्रकरणी निंभोरा पोलिस स्टेशन मध्ये फिर्यादीने दिलेल्या फिर्यादनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: बीड जिल्ह्यात शेतकरी दुहेरी संकटात गतवर्षी ओला दुष्काळ तर यावर्षी कोरडा दुष्काळ

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT