Raver News Saam tv
महाराष्ट्र

Raver News : पती- पत्नीने सोबतच घेतला गळफास; भाऊबीजच्या दिवशी रावेर तालुक्यातील घटनेने खळबळ

Jalgaon news : घरातच कपड्याच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. गावात घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली

Rajesh Sonwane

रावेर (जळगाव) : दिवाळीनंतर येणाऱ्या भाऊबीज सणाच्या दिवशीच पती- पत्नीने घरातच गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रावेर तालुक्यातील विवरे खुर्द येथे उघडकीस आली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून पती- पत्नीने हे टोकाचे पाऊल कोणत्या कारणाने उचलले याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.  

रावेर (Raver) तालुक्यातील विवरे खुर्द येथील कुंभार वाड्यात अनिल देविदास हरणकार (वय ३८) व त्याची पत्नी शितल अनिल हरणकार (वय ३२) हे दोन मुले व एक मुलीसह वास्तव्यास होते. दीपावली उत्सव साजरा केल्यानंतर दोघांनी भाऊबीजच्या दिवशी (३ नोव्हेंबर) दुपारी दिड वाजेच्या सुमारास घरातच कपड्याच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. गावात घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तसेच पोलिसांना (police) घटनेची माहिती देण्यात आली.  

यानंतर निंभोरा पोलिस स्टेशनचे सह पोलिस निरिक्षक हरीदास बोचरे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पाहणी करत पंचनामा केला. निंभोरा पोलिसात धनश्याम हरणकार (रा. विवरे खुर्द) यांनी दिलेल्या फिर्यारीवरून मुत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. पती- पत्नीच्या आत्महत्यांमुळे दोन मुले व एक मुलगी अनाथ झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: मृत व्यक्तीच्या फोटोसमोर अगरबत्ती लावावी की नाही?

Maharashtra Live News Update: परभणीत भर पावसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून पिकांच्या नुकसानीची पाहणी

Video : तेरे जैसा यार... दंडाधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून गाणं गाणे भोवलं! तहसीलदाराचे निलंबन

GST : छत्र्या, मोबाइल, कपडे ते सायकल, सिमेंट होणार स्वस्त, वाचा केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन

मेट्रोच्या एका कोचची किंमत किती असते?

SCROLL FOR NEXT