Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: झोक्‍यातील चार महिन्‍याची बालिका पत्रांसह उडाली; वादळी वाऱ्याचा तडाखा

झोक्‍यातील चार महिन्‍याची बालिका पत्रांसह उडाली; वादळी वाऱ्याचा तडाखा

साम टिव्ही ब्युरो

रावेर (जळगाव) : रावेर तालुका परिसरात वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. या वादळात (Storm) मदीना कॉलनीतील एका घरातील छताच्या पाईपाला झोळीत चार महिन्याची बालिका गुरूवारी (८ मे) रात्री झालेल्या (Raver) चक्री वादळामुळे पत्रे, अँगल, पाईप व झोक्यासहीत उडून गंभीर (Jalgaon News) जखमी झाली. तिच्यावर बऱ्हाणपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर तिचे आई, वडील किरकोळ जखमी झाले आहे. (Live Marathi News)

रावेर तालुका परिसरात गुरूवारी (८ मे) रात्री झालेल्या चक्रीवादळामुळे येथील ईदगाह रोडवरील मदिना कॉलनीतील हरीसखान रईसखान यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील घराचे पत्रे, अँगल व पाईपासह चक्रीवादळामुळे उडाले होते. घराच्या पाईपाला दोरीचा झोका बांधून त्यांची अनबिया हरीशखान (वय ४ महिने) ही झोपली होती. मात्र पत्र्यासहित पाईप, झोका व त्यातील बालीका वादळामुळे उडून घराच्या मागील बाजूस सुमारे शंभर ते दीडशे फूट अंतरावर पत्र्यासह खाली पडला.

वादळ शांत झाल्‍यानंतर शोधाशोध

पाऊस व वादळ शांत झाल्यावर या मुलीची शोधाशोध करण्यात आली. सदर बालिका पत्र्याखाली गंभीर अवस्थेत मिळून आली. तिला तात्काळ बऱ्हाणपूर येथील ऑल इज वेल रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू आहे. दरम्यान तिचे वडील हरीस खान रईस खान (वय ३०) व त्यांची पत्नी आशयमाबी (वय २८) हे किरकोळ जखमी झाले आहेत. माजी नगरसेवक अयुबखान, शेख सादिक, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष शेख मेहमूद यांनी भेट दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT