Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News : प्रशिक्षणासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाहनाला अपघात; एकाचा मृत्यू, ११ जण जखमी

Jalgaon News : शेतकरी प्रशिक्षणासाठी सकाळी क्रूझर अंजनसोंडा व फुलगाव येथून शेतकऱ्यांना घेऊन प्रशिक्षणासाठी निघाले होते. मात्र, बोरघाट भागात वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी होऊन गंभीर अपघात

Rajesh Sonwane

रावेर (जळगाव) : रावेर तालुक्यातील पाल येथे शेतकरी प्रशिक्षण असल्याने याठिकाणी भुसावळ तालुक्यातील अंजनसोंडा व फुलगाव येथील शेतकरी वाहन करून जात होते. दरम्यान बोरघाट परिसरात शेतकऱ्यांनी भरलेले वाहन पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना लागलीच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

सदरचा अपघात रावेर तालुक्यातील बोरघाट परिसरात शनिवारी घडला आहे. या दुर्घटनेत अंजनसोंडा येथील विजय धर्मा राणे (वय ४१) असे मृत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. पाल येथे शेतकरी प्रशिक्षणासाठी सकाळी क्रूझर अंजनसोंडा व फुलगाव येथून शेतकऱ्यांना घेऊन प्रशिक्षणासाठी निघाले होते. मात्र, बोरघाट भागात वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी होऊन गंभीर अपघात झाला. 

अकरा शेतकरी जखमी 

बोरघाट परिसरात गाडीचा अपघात झाल्याने यात दहा शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झाल्यानंतर प्रचंड गोंधळ उडाला होता. जखमींमध्ये विमल चौधरी (वय ५१), प्रशांत चौधरी (४९, रा. फुलगाव ता. भुसावळ), राजेंद्र चौधरी (६२, रा. अंजनसोंडा ता. भुसावळ), पदमाकर पाटील (६२), दिगंबर चौधरी (६९), गोपाळ कोळी (७१), प्रभाकर कोळी (४३), जगन्नाथ कोळी (६८), इंदूबाई पाचपांडे (७०), गणेश चौधरी (६४), उज्ज्वला पाटील (३६) यांचा समावेश आहे. 

जखमी उपचारासाठी रुग्णालयात दाखल 

अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूच्या परिसरातही नागरिक तसेच परिसरातील काही पदाधिकारी मदतीसाठी गेले. यानंतर जखमींना तातडीने भुसावळ येथील श्रीहरी मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्व जखमींवर सध्या उपचार सुरु आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरून नवीन विमानसेवेची प्रतीक्षा

Hotel Fire : झोपेतच काळाचा घाला! श्रावण सोमवारी मंदिराबाहेरील प्रसिद्ध हॉटेलमध्ये आग, ६ जण जिवंत जळाले अन्

High cholesterol: रक्तवाहिन्यांमध्ये साचलेलं कोलेस्ट्रॉल 30 दिवसांत कमी कराचंय? आजच हे 3 बदल करा, लगेच दिसेल परिणाम

Nagpanchami Special : तुळजाभवानी मंदिरात पुरुष भाविकांना प्रवेश बंद, नेमकं काय कारण?

BJP New Team: भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारणीची घोषणा आज, कुणाला कोणती जबाबदारी मिळणार? संभाव्य यादी समोर

SCROLL FOR NEXT