RAVER EARTHQUAKE: 3.3 MAGNITUDE TREMOR RECORDED IN MOHGAN, NO DAMAGE REPORTED saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Earthquake: रावेरच्या सातपुडा पर्वत भागात भूकंपाचे धक्के; मोहगण परिसर हादरला, प्रशासन अलर्ट मोडवर

Jalgaon Raver Earthquake: जळगावच्या रावेर तालुक्यातील सातपुडा परिसरातील मोहगण येथे सकाळी 7.57 वाजता 3.3 रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली. NCS नुसार भूकंपाची खोली 5 किमी होती.

Bharat Jadhav

  • सातपुडा पर्वतातील मोहगण परिसरात 3.3 रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद.

  • भूकंपाची नोंद सकाळी 7.57 वाजून 33 सेकंदांनी झाल्याची माहिती.

  • NCS नुसार भूकंपाची खोली 5 किलोमीटर होती.

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सातपुडा पर्वत भागतील मोहगण परिसर भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनी हादरला. आज म्हणजेच मंगळवारी सकाळी सकाळी ७ वाजून ५७ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. हाती आलेल्या माहिती हा भूकंप ३.३ रिश्टर स्केलचा असल्याची नोंद करण्यात आलीय. दरम्यान सौम्य धक्का असल्यानं ग्रामस्थांना या भूकंपाची जाणीव झाली नाही.

तसेच कोणतीही जीवित वित्तहानी झाली नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या (NCS) अधिकृत नोंदीनुसार, भूकंपाची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल इतकी असून, त्याची खोली जमिनीखाली ५ किलोमीटर असल्याचे नमूद करण्यात आले आहे. NCS च्या नोंदीनुसार या भूकंपाची वेळ सकाळी ७.५७ वाजून ३३ सेकंद अशी आहे.

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहिती नुसार रावेर तालुक्यातील मोहगण ब्रु येथे भूकंपाचा केंद्र बिंदू होता. यामुळे प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आलंय. भूकंपाची तीव्रता कमी असल्याने तालुक्यात या धक्क्याची जाणीव ग्रामस्थांना झाली नाही. शासनाकडून भूकंपाबाबत माहिती महसूल प्रशासनाला देण्यात आलीय.

प्रभारी तहसीलदार संजय तायडे यांनी मंडळाधिकारी अनंत खवले व तलाठी समिर तडवी यांना याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यांनी या परिसरात जाऊन परिस्थिती बाबत माहिती घेतली. मात्र भूकंपाची तीव्रता कमी असल्यामुळे कोणतीही जाणीव झाली नाही. कोणतेही जीवित व वित्तहानी झाली नसल्याचा अहवाल तलाठी व मंडळ अधिकारी यांनी दिला असल्याचे तहसीलदार तायडे यांनी सांगितले.

महसूल प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र हे देशातील भूकंपीय हालचालींचे निरीक्षण करणारे भारत सरकारचे नोडल केंद्र आहे. देशभरातील भूकंपीय हालचालींवर केंद्राकडून २४ तास लक्ष ठेवले जाते.रावेर तालुक्यातील भूकंपाचा धक्का सौम्य स्वरूपाचा असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप-शिंदेसेना युती तुटणार? शिंदेंच्या बालेकिल्ल्यातूनच पहिली ठिणगी, राजकीय वर्तुळात खळबळ

महागाई आवरेना, पगार पुरेना! सीएनजी, दूध, रिक्षा महागली

Maharashtra News Live Update: भापुण्यात अटक झालेल्या कार्यकर्त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी

शिवसेना पक्ष-चिन्ह कुणाचा? सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी, एकनाथ शिंदे दिल्लीत; धनुष्यबाण गोठवण्याच्या मागणीवर मोठं विधान

मुंबईला जाणारा OBC मोर्चा पुण्यात रोखला; आंदोलनावरून OBC संघटनांमध्ये फूट

SCROLL FOR NEXT