Raver Crime Saam tv
महाराष्ट्र

Raver Crime : पती- पत्नीच्या वादात घडले भयंकर; पत्नीने संतापाच्या भरात डोक्यात कुऱ्हाड मारून पतीला संपविले

Jalgaon News : पती-पत्नीमध्ये नेहमी वाद होत असताना पतीकडून पत्नीला मारहाण केली जात होती. नेहमीच्या वादाला कंटाळलेल्या पत्नीने संतापाच्या भरात पतीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले

Rajesh Sonwane

जळगाव : पती- पत्नीमध्ये सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणातून वाद होत असायचे. या वादाला कंटाळलेल्या पत्नीने संतापाच्या भरात पतीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करत हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सदरची घटना रावेर तालुक्यातील निंभोरा बु. गावात घडली असून घटनेने गावात खळबळ उडाली आहे. 

जळगावच्या रावेर तालुक्यातील निंभोरा बु. गावातील न्यू इंग्लिश स्कूलचे निवृत्त शिपाई हुसेन रसूल तडवी (वय ६५) असे घटनेत मृत व्यक्तीचे नाव आहे. माजी ग्रामपंचायत सदस्या हाजराबाई हुसेन तडवी (वय ६०) असे पतीची हत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. सदर घटना शनिवारी (ता. ३०) रात्री दहाच्या सुमारास गणेश कॉलनीत घडली. हुसेन तडवी हे पत्नी हाजराबाई तडवी यांना सतत मारहाण करून त्रास देत होता. 

पत्नीने संतापात केला कुऱ्हाडीने वार 

दरम्यान ३० ऑगस्टला देखील दोघांमध्ये वाद झाला. या वादात संतापलेल्या हजराबाई यांनी हुसेन तडवी यांच्या मानेवर व डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून खून केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस नाईक अविनाश उत्तम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

पत्नीला घेतले ताब्यात 

पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. तर मारेकरी हाजराबाई तडवी यांना पोलिसांनी अटक केली. यानंतर त्यांना रावेर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली. उपनिरीक्षक अभय ढाकणे व दीपाली पाटील, पोलिस नाईक अविनाश पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ankita Walawalkar: जरतारी काठ, नऊवारी थाट मोगर गजरा साजे केसात...

Leopard Rescue : दबक्या पावलाने आला अन् अडकला, कोंबड्यावर ताव मारायला आलेला बिबट्याला केलं जेरबंद, पाहा Video

Maharashtra Live News Update: कुणी कितीही उपसमित्या बनवल्या तरी आरक्षण मिळवणारच- मनोज जरांगे पाटील

Signs of a stroke: ब्रेन स्ट्रोक येण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' मोठे बदल; सामान्य समजून दुर्लक्ष करू नका

Bigg Boss 19 : कॅप्टन्सी टास्कमध्ये तुफान राडा; मृदुल तिवारी जखमी, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT