accident Saam tv
महाराष्ट्र

Raver Accident : लग्न समारंभातून परतताना काळाचा घाला; बसची दुचाकीला जोरदार धडक, महिलेचा मृत्यू

Jalgaon News : मध्य प्रदेश राज्यातील बंभाळा येथे लग्न असल्याने आरती पाटील या गेल्या होत्या. दरम्यान लग्न व ओवाळनीचा कार्यक्रम आटोपून आरती पाटील मोटर सायकलवरून घरी येत होत्या

Rajesh Sonwane

रावेर (जळगाव) : राज्याच्या सामीलगत असलेल्या मध्य प्रदेशातील बंभाळा येथे लग्न समारंभासाठी गेले असता लग्न सोहळा पार पडून परतलेल्या महिलेवर काळाने झडप घातली. राज्य परिवहन महामंडळाच्या बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील महिला फेकली जाऊन तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रावेरजवळ घडली. 

रावेर (Raver) तालुक्यातील बामणोद येथील रहिवासी आरती संदीप पाटील असे अपघातात मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. मध्य प्रदेश (Madhya Pradesh) राज्यातील बंभाळा येथे लग्न असल्याने आरती पाटील या गेल्या होत्या. दरम्यान लग्न व ओवाळनीचा कार्यक्रम आटोपून आरती पाटील मोटर सायकलवरून घरी येत होत्या. याच दरम्यान राज्य परिवहन महामंडळच्या बस चालकाने मोटर सायकलला मागून जोरदार धडक दिली. मागून धडक बसल्याने मोटर सायकलवर मागे बसलेल्या आरती पाटील या फेकल्या गेल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रावेर शहराच्या जवळ घडला.  

बस चालकावर गुन्हा दाखल 

आरती यांच्या निधनाची बातमी समजताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. आरती पाटील यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. सदर (Accident) अपघातानंतर महामंडळाच्या बसला रावेर पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आले. तर अपघाताबाबत पोलिसात नोंद करत चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT