Railway News  AI Image
महाराष्ट्र

रेल्वे प्रवाशांना मोठा झटका! जळगावसाठी धावणाऱ्या गरीब रथ, सेवाग्रामसह ५ गाड्यांचे मार्ग बदलले; वाचा सविस्तर

जळगावसह खान्देशातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! कसारा-आसनगावदरम्यान रेल्वे ब्लॉकमुळे गरीब रथ, सेवाग्रामसह ५ एक्स्प्रेस गाड्यांचे मार्ग बदलले आहेत.

Namdeo Kumbhar

संजय महाजन, जळगाव प्रतिनिधी

मध्य रेल्वेने घेतलेल्या विशेष ब्लॉकेडमुळे उत्तर महाराष्ट्रातून मुंबईकडे आणि परतीच्या प्रवासात जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहेत. कसारा ते आसनगाव दरम्यान सुरू असलेल्या रेल्वेच्या विकास कामांमुळे जळगावसह खान्देशातून धावणाऱ्या गरीब रथ आणि सेवाग्रामसह तब्बल ५ महत्त्वाच्या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असून, आज आणि उद्या या गाड्या जळगाव स्टेशनवर येणार नसल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

कसारा ते आसनगावदरम्यान तिसऱ्या मार्गिकेचे काम आणि यार्ड + विस्तारीकरणासाठी मध्य रेल्वेने १४ ते १६ ऑक्टोबरदरम्यान विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला आहे. या ब्लॉकचा थेट फटका उत्तर महाराष्ट्रातून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे. ५ महत्त्वाच्या गाड्या मार्ग बदलून धावणार आहे. यानुसार १४ आणि १५ ऑक्टोबरला सेवाग्राम व गरीब रथ कल्याणमार्गे वळवल्याने या दोन्ही गाड्या जळगावला येणार नसल्याचे रेल्वेने कळवले आहे. नाशिक, मनमाड, चाळीसगाव, पाचोऱ्याच्या प्रवाशांना याचा फटका बसणार आहे.

वळवलेल्या गाड्या अशा

गाडी क्र. १२१३९ सीएसएमटी-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस १४ आणि १५ ऑक्टोबरला पुणे-मनमाडमार्गे वळवली आहे. क्र. १२१८८ सीएसएमटी - जबलपूर गरीब रथ एक्स्प्रेस १५ ऑक्टोबर रोजी पुणे-मनमाड मार्गे धावेल. १४ ऑक्टोबर रोजी गाडी क्र. १२५९८ सीएसएमटी - गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेस पुणे मार्गे वळवली आहे. ११०४३ दादर -बलिया एक्स्प्रेस १४ ऑक्टोबर रोजी पुणे-मनमाडमार्गे जाईल. ११०४७ दादर - गोरखपूर एक्स्प्रेस ही १५ ऑक्टोबर रोजी पुणेमार्गे वळवली आहे.

आसनगाव आणि कसारा दरम्यानच्या तिसऱ्या मार्गिकेचे हे काम, कसारा आणि कल्याण दरम्यानच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेच्या प्रकल्पाचाच एक भाग आहे. यामुळे मेल/एक्सप्रेस आणि उपनगरीय रेल्वे सेवांची वाहतूक स्वतंत्र करणे शक्य होईल आणि मार्गिकेची क्षमता भविष्यात वाढवण्यासाठी आवश्यक असलेली अतिरिक्त पायाभूत सुविधा निर्माण होईल. तसेच, यामुळे कामकाजातील लवचिकता वाढेल, गाड्यांच्या हालचालींचे नियमन अधिक सुलभ होईल आणि अतिरिक्त गाड्यांची सेवा हाताळण्याची क्षमता वाढण्यास मदत होईल.

ब्लॉकच्या तारखा:

दिनांक १४.१०.२०२६ (बुधवार) ते दिनांक १६.१०.२०२६ (शुक्रवार)

दिनांक १४.१०.२०२६ (बुधवार) रोजी १५.३५ ते २०.३५ वाजेपर्यंत,

दिनांक १५.१०.२०२६ (गुरुवार) रोजी १५.३५ ते १९.३५ वाजेपर्यंत,

दिनांक १६.१०.२०२६ (गुरुवार-शुक्रवार मध्यरात्र) रोजी ०३.०० ते ०६.०० वाजेपर्यंत आणि

दिनांक १६.१०.२०२६ (शुक्रवार) रोजी १५.३५ ते १९.३५ वाजेपर्यंत.

१४.१०.२०२६ रोजी प्रवास सुरू होणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

दिनांक १४.१०.२०२६ रोजी सुटणारी गाडी क्रमांक 11081 लोकमान्य टिळक टर्मिनस - गोरखपुर एक्सप्रेस आता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १६.३५ ऐवजी १७.५० वाजता सुटेल,

दिनांक १४.१०.२०२६ रोजी सुटणारी गाडी क्रमांक 12107 लोकमान्य टिळक टर्मिनस - सीतापुर एक्सप्रेस आता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १६.२५ ऐवजी १७.३५ वाजता सुटेल,

दिनांक १४.१०.२०२६ रोजी सुटणारी गाडी क्रमांक 13380 लोकमान्य टिळक टर्मिनस - धनबाद एक्सप्रेस आता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १६.५५ ऐवजी १८.०५ वाजता सुटेल.

कल्याण - कर्जत - पुणे - मनमाड मार्गे वळवण्यात येणाऱ्या गाड्या

गाडी क्रमांक 12598 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - गोरखपुर अंत्योदय एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक १४.१०.२०२६)

गाडी क्रमांक 11043 दादर - बलिया एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक १४.१०.२०२६)

गाडी क्रमांक 12188 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - जबलपुर गरीब रथ एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक १५.१०.२०२६)

गाडी क्रमांक 11047 दादर - गोरखपुर एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक १५.१०.२०२६)

गाडी क्रमांक 12139 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक १४.१०.२०२६ आणि दिनांक १५.१०.२०२६).

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fort : इतिहासप्रेमींसाठी खास ठिकाण! डोंगराच्या माथ्यावर वसलेल्या मंदिरामुळे प्रसिद्ध आहे 'हा' किल्ला

Maharashtra News Live Update: सौरव दास आणि आशुतोष रांका यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी

राजकारणात खळबळ! विरोधी पक्षाला खिंडार, ३ आमदार आज भाजपात प्रवेश करणार

Breakfast After Tea : चहा प्यायल्यानंतर किती वेळाने नाश्ता करावा?

Famous Actor : काळजाचा ठोकाच चुकला! इमरान हाश्मीचा थरारक अपघात? हवेत पलटी झाली SUV कार अन् थेट...|VIDEO

SCROLL FOR NEXT