JALGAON PWD BRIBERY CASE: ENGINEER CAUGHT ACCEPTING RS 5 LAKH BRIBE BY ACB Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon : बिल मंजूर करण्यासाठी मागितले १५ लाख, बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं

Jalgaon Bribe News : जळगावातील सार्वजनिक बांधकाम विभागात मोठ्या लाचखोरीचा भंडाफोड झाला आहे. शाखा अभियंता योगेश अहिरे यांना ५ लाखांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ अटक केली.

Alisha Khedekar

  • जळगावातील सार्वजनिक बांधकाम विभागात लाचखोरीचा प्रकार उघडकीस आला

  • शाखा अभियंता योगेश अहिरे यांना एसीबीने रंगेहाथ पकडले

  • बिल मंजुरीसाठी १५ लाखांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे

  • तडजोडीनंतर ५ लाखांची लाच स्वीकारताना आरोपी अटकेत सापडला

संजय महाजन, जळगाव

जळगाव जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागात मोठ्या लाचखोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. शाखा अभियंता योगेश अहिरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. बिल मंजूर करून देण्यासाठी तब्बल १५ लाख रुपयांची मागणी करत अखेर ५ लाखांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली. या घटनेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील एका मक्तेदाराचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मोठे बिल बाकी होते. हे बिल मंजूर करून रक्कम मिळवून देण्यासाठी संबंधित तक्रारदारने शाखा अभियंता योगेश अहिरे यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र, बिल काढून देण्यासाठी अहिरे यांनी थेट १५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. सुरुवातीला तक्रारदारला मोठी रक्कम देण्याचा दबाव टाकण्यात आला होता.

तक्रारदार लाच देण्यास तयार नसल्याने त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचण्याचा निर्णय घेतला. शनिवारी दुपारच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालय परिसरात तडजोडीनंतर ५ लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना योगेश अहिरे यांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

या कारवाईमुळे सार्वजनिक बांधकाम विभागात एकच खळबळ उडाली असून, कार्यालय परिसरात नागरिक आणि कर्मचाऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आरोपी शाखा अभियंत्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, सरकारी कार्यालयांमधील वाढत्या भ्रष्टाचाराच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brain Stroke Symptom: हाता-पायाला सतत मुंग्या येतात? होऊ शकत ब्रेन स्ट्रोकचं कारण, जाणून घ्या लक्षणे

माजी मुख्यमंत्र्यांच्या भाच्यावर हल्ला; राजकारणात खळबळ

Modi Cabinet Expansion: मोठी बातमी! मोदी सरकार 12 मंत्र्यांना घरी बसवणार; मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी

Kalyan : पाण्याच्या बाटलीवरून मध्यरात्री धिंगाणा, हॉटेल चालकाला बेदम मारहाण

Low BP Tips: उन्हाळ्यात लो ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी काय कळजी घ्यावी? 7 उपाय जाणून घ्या अन्यथा...

SCROLL FOR NEXT