Eknath Khadse Girish Mahajan Saam tv
महाराष्ट्र

Political News: खडसेंच्या मुलाचे काय झाले, तपासण्याची गरज; गिरीश महाजनांचे खळबळजनक वक्‍तव्‍य

खडसेंच्या मुलाचे काय झाले, तपासण्याची गरज; गिरीश महाजनांचे खळबळजनक वक्‍तव्‍य

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : एकनाथ खडसेंनाही मुलगा होता. त्याचे काय झाले, याचे उत्तर त्यांनी द्यावे. त्यांच्या मुलाने आत्महत्या केली की त्याचा खून झाला, हे तपासण्याची गरज आहे; असे खळबळजनक वक्‍तव्‍य राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी माध्‍यमांशी बोलताना केले. (Tajya Batmya)

राष्ट्रवादीच्या (NCP) मेळाव्यात सुदैवाने गिरीश महाजनांना मुलगा नाही, असे वक्तव्य (Eknath Khadse) खडसेंनी केले होते. यावर पत्रकारांनी विचारलेल्‍या प्रश्‍नाला उत्‍तर देताना महाजन बोलत होते. मला दोन मुली असून, मी त्यांना राजकारणात आणलेल नाही, मला त्याचा आनंद आहे. असेही महाजन यांनी सांगितले.

खडसे अस्‍वस्‍थ झालेत

दूध संघात सुरू असलेल्या चौकशीत दररोज काहीतरी बाहेर येत आहे. त्यामुळे एकनाथ खडसे अस्वस्थ झाले आहेत. ते काहीही बोलायला लागले आहेत. ते मला चावट म्हणतात. परवा बोलताना ते म्हणाले, महाजन यांना मुलगा असता तर तोही आमदार आणि सूनही आमदार झाली असती. त्यांचे हे बोलणे चुकीचे आहे. मला दोन मुली आहेत. त्याचा मला अभिमान आहे. मात्र खडसे यांना एक मुलगा होता, त्याचे काय झाले? त्याने आत्महत्या केली की त्याचा खून झाला, हेसुद्धा तपास करण्याची आता गरज आहे. वास्तविक, मला हे बोलायचे नव्हते; परंतु मला आता ते बोलणे भाग पडले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur Crime: धक्कादायक! जुन्या घरगुती वस्तूंची विकणाऱ्याला जबर मारहाण; पाकिस्तानी समजून डोक्यात घातला सिमेंट ब्लॉक

Subodh Bhave- Mansi Naik Movie: सुबोध भावे आणि मानसी नाईक दिसणार एकत्र; 'सकाळ तर होऊ द्या' या दिवशी होणार रिलीज

Maharashtra Live News Update: आदिवासी विकासमंत्र्यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद

Shivali Parab: शिवालीचं सौंदर्य खुललं, फोटो पाहून चाहते झाले घायाळ

उंच पाळणा बंद पडला, 30 ते 35 लोकांचा जीव टांगणीला, पाहा थरारक व्हिडिओ

SCROLL FOR NEXT