Jalgaon Latest News 
महाराष्ट्र

Jalgaon : खाकीतला अधिकारीच निघाला चोर, 35 हजारांच्या चोरीनं फुटलं बिंग

Jalgaon Latest News : जळगावच्या चोपडा बसस्थानकावर ३५ हजारांची चोरी आणि त्यामागचा मास्टरमाइंड निघाला एक पोलीस अधिकारी! प्रल्हाद मान्टे या अधिकाऱ्यानेच चोरीचं रॅकेट चालवत असल्याचा उघडकीस आलेला प्रकार ऐकून धक्का बसेल.

Namdeo Kumbhar

संजय महाजन, साम टिव्ही न्यूज

Jalgaon police officer theft mastermind : पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर अनेकदा वेगवेगळ्या कारणाने प्रश्न निर्माण केले जातात. मात्र आता एका चोरीच्या प्रकरणामुळे खाकीवर पुन्हा ठपका ठेवला जातोय. काय आहे हे प्रकरण, पाहूयात या रिपोर्टमधून....

चोर कितीही हुशार असला तरी काही न काही पुरावे मागे सोडतोच...मात्र या चोरांचा गुरुच पोलीस असेल तर? होय...ऐकून एखादं फिल्मी कथानक वाटेल असाच प्रकार घडलायं...जळगावच्या चोपड्यात...मात्र हा फिल्मी सस्पेन्स कसा संपला ऐका... जळगावच्या चोपडा बसस्थानकावर एका शेतकऱ्याचे 35 हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. पोलीसांनी चोरट्यांचा पाठलाग केला...सापळाही रचला...चोरट्यांना गजाआडही केलं. आणि इथेच आला क्लायमॅक्स...कारण पोलिस चौकशीत जे समोर त्यानं खळबळ उडाली. या सगळ्या स्टोरीतला हिरोच म्हणजे एक पोलिसच व्हिलन ठरला...हाच पोलिस अधिकारी टोळीचा म्होरक्या निघाला...बसला न तुम्हालाही धक्का....तर या व्हिलनचं नाव आहे प्रल्हाद मान्टे...त्यानं चोरीचा प्लॅन कसा आखला पाहूया.

चोरीचा मामला,पोलिसही गुंतला

चोरीच्या रॅकेटचा म्होरक्या पोलीस अधिकारी प्रल्हाद मान्टे ताब्यात

मान्टे बसस्थानकावर चालवायचा चोरीचं रॅकेट

ऑनड्युटी मान्टे चोरीचे प्लॅन आखायचा

मान्टेकडून चोरीसाठी स्पेशल टीम,टीमला मान्टेकडून प्रशिक्षण

प्रल्हाद मान्टे खाकीतला हा चिल्लर चोर अखेर गजाआड झालाच...मान्टे खरतर तीन महिन्यात पोलिस दलातून निवृत्त होणार होता. मात्र त्याच्याच साथिदारांना खऱ्या प्रामाणिक पोलिसांनी पकडल्यानं मान्टेचं बिंग फुटलं आणि पोलिसांनाही धक्का बसला... खाकीतला रक्षकच जेव्हा गरीबांच्या पैशावर डल्ला मारतो तेव्हा त्याला कडक शासन व्हायलाचं हवं..मात्र मान्टे किती वर्ष अशी टोळी चालवत होता? त्यातून त्यानं कुठे आणि किती चोऱ्या केल्या याचा सखोल तपास पोलिस करतील तेव्हा आणखी बरेच कारनामे समोर येतील एवढं नक्की...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT