Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : पुलाखाली बसून अंगावर पेट्रोल टाकत महिलेने घेतले जाळून; महिलेचा मृत्यू

Parola News : महिलेने बाटलीमध्ये पेट्रोल भरून आणून आपल्या अंगावर टाकून वाकड्या पुलाच्या खालीच दगडावर बसून जाळून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे

साम टिव्ही ब्युरो

पारोळा (जळगाव) : कजगाव रस्त्यावरील वाकडा पुलाखाली एका अज्ञात महिलेने अंगावर पेट्रोल टाकून जाळून (Jalgaon) घेतले. यात त्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना १३ फेब्रुवारीला सायंकाळच्या सुमारास घडली. सदर महिला गरोदर असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. याबाबत पारोळा पोलिस (Parola Police) तपास करत आहेत. (Maharashtra News)

पारोळ्याजवळील (Parola) कजगाव रस्त्यावर असलेल्या वाकडा पूलाच्या खाली एका ३० ते ३५ वय असलेल्या अज्ञात महिलेने बाटलीमध्ये पेट्रोल भरून आणून आपल्या अंगावर टाकून वाकड्या पुलाच्या खालीच दगडावर बसून जाळून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. घटना लक्षात आल्यानंतर (Police) पोलीस दाखल झाले. पंचनामा करत महिलेस कुटीर रुग्णालय येथे नेले असता डॉ. जितेंद्र पाटील यांनी तपासणी केली त्यात महिला ही गरोदर असल्याचा अंदाज वर्तविला आहे. परंतु शवविच्छेदनानंतर हे समजेल.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ओळख पटविण्याचे आव्हान 

महिलेच्या अंगावर लाल रंगाची साडी, गळ्यात मंगळसूत्र, पायात चप्पल अशी चांगल्या घराण्यातील महिला असल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसून आले. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पवार हे करीत आहे. पंचनामा करून सदर महिलेने आणलेली पेट्रोलची बाटली तसेच कपड्याचे नमुने व चप्पल ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss : डाएट, व्यायाम करूनही वजन कमी होत नाही? 'या' चुका आहेत कारणीभूत

Maharashtra News Live Update: नागपुरात उद्या शांतता मार्च, सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ सिजेपी देशभरात रस्त्यावर उतरणार

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! वऱ्हाडाच्या बसची कंटेनरला धडक; १० ते १२ प्रवासी गंभीर, पाहा VIDEO

Ramesh Mhatre : मोठी बातमी! नगरसेवक रमेश म्हात्रेंना कोर्टाचा दणका, शरण येण्याचे आदेश

High blood pressure: हाय बीपीचा त्रास एका रात्रीत होत नाही; शरीरात दिसतं हे 1 सायलेंट लक्षण

SCROLL FOR NEXT