Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Bribe Case : उताऱ्यावर कर्जाचा बोजा चढविण्यासाठी हजार रुपयांची मागणी; तलाठीसह एकजण ताब्यात

Jalgaon News : शेत जमिनीवर तक्रारदाराने गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमधून कर्ज घेण्यासाठी अर्ज केला होता

Rajesh Sonwane

पारोळा (जळगाव) : शेतकऱ्याकडून शेतीच्या उताऱ्यावर कर्जाचा बोजा चढविण्यासाठी एक हजार रुपयाची मागणी केली. या प्रकरणी तलाठ्‍यासह त्याच्या पंटरला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पारोळा (Parola) तालुक्यातील लोणी बुद्रूक येथील तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे साडेसहा एकर शेती आहे. या शेत जमिनीवर तक्रारदाराने गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमधून कर्ज घेण्यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार, सातबारा उताऱ्यावर बोजा चढवणे आवश्यक होते. त्यासाठी तक्रारदार यांनी तलाठी सुभाष विठ्ठल वाघमारे (वय ३४) यांची चोरवड येथील कार्यालयात ४ सप्टेंबरला भेट घेत त्यांच्याशी कामासंदर्भात चर्चा केली. त्यावर तलाठी वाघमारे यांनी तक्रारदाराला सांगितले, की सातबारा उताऱ्यावर कर्जाचा बोजा चढविण्याच्या मोबदल्यात चार उताऱ्याचे प्रत्येकी दोनशे रुपये याप्रमाणे आठशे रुपये व मागील कामाचे दोनशे असे एकूण एक हजार रुपयांची (Bribe) मागणी केली. 

याबाबतर तलाठीचा पंटर शरद कोळी याने लाचेची रक्कम त्याच्या फोन पे अकाउंटवर टाकण्यासाठी वेळोवेळी शेतकऱ्याकडे तगादा लावला. यामुळे शेतकऱ्याने (Jalgaon ACB) जळगाव एसीबीकडे तक्रार केली. या तक्रारीच्या अनुषंगाने तलाठी सुभाष वाघमारे व त्याचा पंटर शरद प्रल्हाद कोळी यांना सापळा रचून ताब्यात घेतले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT