Jalgaon Shocking News  Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Shocking News : गरबा खेळताना अचानक तब्येत बिघडली; जळगावमध्ये 'दांडिया किंग'चा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

jalgaon pachora News : गरबा खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या तरुणाच्या मृत्यूने शहरात शोककळा पसरली आहे.

Vishal Gangurde

संजय महाजन, साम टीव्ही

जळगाव : देशासहित राज्यभरात नवरात्रीनिमित्त दांडिया गरबाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. गरबानिमित्त सर्वत्र तरुण मंडळी जल्लोष करताना दिसत आहेत. दरवर्षी प्रमाणे अनेक गरबा रसिक दांडिया खेळताना दिसत आहेत. राज्यभरात गरबा रसिक मोठ्या उत्साहाने दांडिया खेळत असताना जळगावमधून दुर्दैवी घटना समोर आली आहे. जळगावमध्ये गरबा खेळताना एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने दांडिया प्रेमींमध्ये शोककळा पसरली आहे.

जळगावच्या पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील कैलादेवी मंदिराजवळ दांडिया गरबा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात एका २६ वर्षीय युवकाचा गरबा खेळताना हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. २६ वर्षीय युवकाच्या मृत्यूने स्थानिक नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.

युवकासोबत नेमकं काय घडलं?

पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील कैलादेवी मंदिराजवळील दांडिया गरबा जल्लोष कार्यक्रमात सिंधी कॉलनी रहिवाशी असलेला लखन प्रेमलाल वाधवानी (२६) हा दांडिया खेळत असतानाच त्याची तब्येत बिघडली. त्यानंतर त्याला तत्काळ जवळील विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये उपचारसाठी दाखल केले.

यावेळी डॉ भुषण मगर यांच्या सह वैद्यकीय टीमने त्याचा जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश मिळालं नाही. लखनच्या मृत्यूची वार्ता शहरात पसरल्यानंतर सर्वांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. या घटनेनंतर काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी देखील तत्काळ भेट दिली.

शहरातील दांडिया प्रेमीमध्ये लखन होता प्रसिद्ध

लखन वाधवानी हा दांडिया प्रेमीमध्ये प्रसिद्ध होता. दरवर्षी 'दांडिया किंग'चा माणकरी ठरत होता. त्याच्या कुटुंबाची अत्यंत नाजूक परीस्थिती आहे. लखन हा एकुलता एक मुलगा होता आणि घरातील कर्ता होता. चाळीसगाव येथील एका खासगी पेट्रोल पंपावर कामाला होता. त्याच्या जाण्याने शहरात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, मागील काही वर्षांत गरबा खेळताना काही तरुणांचे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाले आहेत. तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटका येण्याचे प्रमाण वाढू लागल्याचे दिसत आहे. हृदयविकाराच्या झटका येण्याचं प्रमाण वाढू लागल्याने तरुणांची चिंता वाढली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahrukh Khan Real Name: किंग खानचे खरं नाव शाहरुख नाही तर 'हे' आहे; तुम्हाला माहितीये का?

Government Scheme: विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज; पीएम विद्यालक्ष्मी योजना नक्की आहे तरी काय?

Modi-Jinping: भारत-चीनमध्ये होणार नवी सुरुवात? रशियानंतर आता ब्राझीलमध्ये होऊ शकते मोदी-जिनपिंग भेट

Viral Video: चाळीतील महिलांची सर्वत्र चर्चा! दिलात झापुक झूपूक गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO एकदा पाहाच

Apaar ID: प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार अपार कार्ड, १२ अंकी युनिक नंबर, उपयोग काय?

SCROLL FOR NEXT