Pachora News Saam tv
महाराष्ट्र

Pachora News : गुरांना पाणी पाजण्यासाठी नदीवर गेला; म्हशींना बाहेर काढताना डोहात बुडून तरुणाचा मृत्यू

Jalgaon Pachora News : सकाळी गुरे चारण्यासाठी गेलेल्या आकाश हा दुपारी गुरांना घरी घेऊन येत होता. तत्पूर्वी सर्व गुरांना पाणी पाजण्यासाठी गिरणा नदीतील डोहात घेऊन गेला. दुपारी चारच्या सुमारास म्हशींना पाणी पाजण्यासाठी नेले

Rajesh Sonwane

पाचोरा (जळगाव) : उन्हाळ्याचे दिवस असल्याने गावात पुरेसे पाणी नाही. तर नदी देखील कोरडी पडली असल्याने केवळ नदीतील निर्माण झालेल्या डोहात पाणी आहे. याठिकाणी गुरांना गिरणा नदीवर पाणी पाजण्यासाठी गेलेल्या तरुण पाय घसरून डोहात पडला. यातून त्याला बाहेर निघता न आल्याने तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना माहेजी शिवारात घडली.

पाचोरा तालुक्यातील माहेजी येथील आकाश राजेश यादव (वय २२) असे घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान सकाळी गुरे चारण्यासाठी गेलेल्या आकाश हा दुपारी गुरांना घरी घेऊन येत होता. तत्पूर्वी सर्व गुरांना पाणी पाजण्यासाठी गिरणा नदीतील डोहात घेऊन गेला. दुपारी चारच्या सुमारास म्हशींना पाणी पाजण्यासाठी नेले. यानंतर तो घरी परत येणार होता. परंतु काही म्हशी या डोहातील पाण्यात उतरल्या होत्या. 

पाण्यातील म्हशींना बाहेर काढताना डोहात पडला 

गिरणा नदीपात्रात असलेल्या डोहातील मध्यभागी गेलेल्या म्हशींना पाण्यातून बाहेर काढण्यासाठी आकाश नदीत उतरला. मात्र, पाण्याचा व खोल डोहाचा त्याला अंदाज न आल्याने आकाश डोहात बुडाला. त्याला बाहेर निघता न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला होता. दरम्यान आकाश घेऊन गेलेल्या सर्व म्हशी गोठ्यात पोहोचल्या. मात्र, आकाश न आल्याने त्याचा मोठा भाऊ ज्ञानेश्वर त्याला शोधण्यासाठी गेला. मात्र, तो कुठेही मिळून आला नाही. 

डोहात आढळला मृतदेह 

तर ज्ञानेश्‍वरने आई सरलाबाई व वडील राजेश यांना आकाश दिसत नसल्याचे सांगितले. दररोज प्रमाणे आकाश गुरांना नदीवर घेऊन जात असल्याने तो नदीपात्रात बुडाला असावा, असा संशय आला. त्यानुसार कुटुंबीय व ग्रामस्थ नदीपात्रातील डोहात आकाशचा शोध घेण्यासाठी गेले. यानंतर दीड तासांनी डोहातून त्याचा मृतदेह आढळून आला. आकाशचा मृतदेह पाहून आई- वडिलांनी एकच आक्रोश केला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gadchiroli Flood: गडचिरोलीत पावसाचा कहर; २५ प्रमुख रस्ते आणि महामार्ग वाहतुकीसाठी बंद

Friday Horoscope: आज कोणत्या राशीचं भाग्य चमकणार? जाणून घ्या तुमच्या आयुष्यात काय बदल घडणार

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

SCROLL FOR NEXT