Pachora News Saam tv
महाराष्ट्र

Pachora News : हातपाय धुवायला गेले असता झाला घात; शेततळ्यात बुडून दोघांचा मृत्यू

Jalgaon News : तारखेडा रस्त्यावरील अंतुर्ली बुद्रुक शिवारातील शेततळ्याच्या पाण्यात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास दोघांचे मृतदेह आढळले. शेततळ्यात पाय घसरल्याने ते पडले असावेत, असा अंदाज व्यक्त होत आहे

Rajesh Sonwane

पाचोरा (जळगाव) : अंतुर्ली येथे शेत शिवारात असलेल्या शेततळ्यात तरुणांसह बालक मजुरांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान काम आटोपल्यानंतर हातपाय धुण्यासाठी शेततळ्यावर गेले असताना पाय घसरून हे दोघी बुडाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. सदर घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी मृतदेह बाहेर काढले. तर पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पाचोरा तालुक्यातील पुनगाव येथील रवी परभत कोळी (वय १४) व अंतुर्ली येथील पदमसिंग भगवान पाटील (वय २१) असे बुडून मृत झालेल्या दोघांचे नाव आहे. दोघेजण शेत मजुरीचे काम करत होते. शेतात गेले असताना तारखेडा रस्त्यावरील अंतुर्ली बुद्रुक शिवारातील शेततळ्याच्या पाण्यात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास दोघांचे मृतदेह आढळले. शेततळ्यात पाय घसरल्याने ते पडले असावेत, असा अंदाज व्यक्त होत आहे. 

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह बाहेर काढले. तर सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. यानंतर ग्रामस्थांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

घरातील कमावणारा एकुलता एक मुलगा गेला 

मृतांमधील पद्मसिंग पाटील घरातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या वडिलांचे आठ वर्षांपूर्वी निधन झाले असल्याने घरात कमावणारा एकटा पुरुष होता. आई व विवाहित बहिणी समवेत तो राहत होता. मिळेल ती कामे करून कुटुंबाचा चरितार्थ चालवीत होता. त्याच्या मृत्यूमुळे आई व बहिणीने एकच आक्रोश केला. तर रवींद्र कोळी याच्या मागे आईवडिल, दोन भाऊ असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT