Pachora News Saam tv
महाराष्ट्र

Pachora News : विहिरीत काम करताना विजेचा झटका; कामगाराचा मृत्यू

Jalgaon News : शेतात विहिरीच्या बांधकामासंदर्भात बोलावले होते. विहिरीत काम करीत असताना महावितरणच्या वायरमुळे त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला

Rajesh Sonwane

पाचोरा (जळगाव) : विहिरीत दुरुस्तीच्या कामासाठी उतरलेल्या तरुण कामगाराला विजेचा जोरदार झटका बसला. यात  झाल्याची घटना पाचोरा तालुक्यातील वडगाव मोलाणे येथे १८ जूनला घडली. महावितरणच्या लोंबकळलेल्या विड्यात तारेला स्पर्श होऊन सदरची दुर्दैवी घटना घडली.  

भडगाव येथील रहिवासी कैलास युवराज पाटील (वय ४७) असे मयत मजुरांचे नाव आहे. शेतकऱ्यांच्या शेतात विहीर दुरुस्तीचे काम करून कैलास परिवाराचा उदरनिर्वाह करत होते. दरम्यान १८ जूनला देखील ते सकाळी पाचोरा तालुक्यात वडगाव मोलाणे येथे दिघी शिवारात शेतात विहिरीच्या बांधकामासंदर्भात बोलावले होते. विहिरीत काम करीत असताना महावितरणच्या वायरमुळे त्यांना (Electric Shock) विजेचा जोरदार धक्का बसला.

विजेचा धक्का बसून फेकले गेलेल्या कैलास यांना तत्काळ पाचोरा (Pachora) रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, मजुराच्या मृत्यूप्रकरणी नातेवाईकांनी आर्थिक मदतीची मागणी शासनाकडून केली आहे. तर हा मृत्यू महावितरणच्या दुर्लक्षामुळे झाला असल्याचे सांगून त्यांनी भरपाई द्यावी; अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. दरम्यान महावितरणकडून २० हजाराचा धनादेश देण्यात आला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Acidity : ॲसिडीटीपासून मिळेल त्वरित आराम, फक्त रोज प्या 'हा' एक ज्यूस

शेंगदाणा टाकून अळुचं फतफतं कसं बनवायचं? सोपी रेसिपी| Alu Fadfade Recipe

NEET पेपर फुटी प्रकरणात CBI चा धक्कादायक खुलासा, परीक्षेच्या १० दिवस आधीच मोटेगावकरकडे प्रश्नपत्रिका, ५ लाख घेतल्याचं उघड

Maharashtra News Live Update : RTE प्रवेशात मोठा घोळ, ऑनलाइन पोर्टलवर बंद शाळा, पालकांची मात्र धावाधाव

Beed News: बीडमध्ये चाललंय काय? आश्रम शाळेत अधिकाऱ्याकडून महिला कर्मचाऱ्याचा छळ, नवऱ्याला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT