Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : वयोवृद्ध पाटील दांम्पत्याने पोलिसांना केला फोन; पोलिस पोहचले तोपर्यंत सारे संपले

वयोवृद्ध पाटील दांम्पत्याने पोलिसांना केला फोन; पोलिस पोहचले तोपर्यंत सारे संपले

साम टिव्ही ब्युरो

पाचोरा (जळगाव) : लोहटार (ता. पाचोरा) येथील वृद्ध पाटील दांम्‍पत्याने पाचोरा पोलिसांना फोन करून आम्ही आत्महत्या करत आहोत, असे कळवले व विषारी द्रव सेवन केले. (Police) पोलिसांनी लगबगीने घटनास्थळी पोहोचून (Pachora) दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु आज (१० जुलै) दोघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. (Tajya Batmya)

राज्‍य परिवहन महामंडळाचे निवृत्त कर्मचारी ईश्वर नामदेव पाटील (वय ७८) व त्यांच्या पत्नी प्रमिला पाटील (वय ७२) हे दाम्पत्य दोन मुले, सुना, नातवंडे या कुटुंबीयांसह लोहटार येथे वास्तव्यास आहेत. हा परिवार अत्यंत धार्मिक, सुस्वाभावी, सरळ मार्गी व आपल्या कामधंद्यात मग्न असल्याने एक आदर्श परिवार म्हणून या परिवाराची ग्रामस्थांना ओळख होती. असे असताना ८ जुलैला पहाटे चार वाजेच्‍या सुमारास ईश्वर पाटील यांनी पाचोरा पोलीस स्टेशनला फोन केला की, मी लोहटारहून ईश्वर पाटील बोलतोय, मी व माझी पत्नी संसाराला कंटाळून स्वखुशीने आत्महत्या करीत आहोत. त्यासाठी कुणालाही कारणीभूत अथवा जबाबदार धरू नये. असे सांगून त्यांनी फोन बंद केला.

फोनच्या आधारे पोलिसांनी लगबगीने लोहटार येथे जाऊन प्रकार जाणून घेतला असता ईश्वर पाटील व प्रमिला पाटील या दोघांनी विषारी औषध सेवन केल्याने (Pachora Police) अत्यवस्थ झाले होते. पोलिसांनी तातडीने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचार करून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु आज मध्यरात्री दोनच्या सुमारास प्रमिला पाटील यांचा मृत्‍यू झाला. तर सकाळी ८ वाजता ईश्वर पाटील यांनीही अखेरचा श्‍वास घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Maharashtra News Live Update: नांदणी मठाची माधुरी हत्ती नांदणी मठाकडे येण्याचा मार्ग मोकळा

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

Railway News : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! मुंबईसह ७ हाय-डेंसिटी कॉरिडॉरच्या चौपदरीकरणाला मंजुरी

Face Care: चेहऱ्यावर वारंवार दिसतात व्हाइटहेड्स? डॉक्टरांनी सांगितलेले सोपे उपाय नक्की करुन बघा, ५ दिवसात दिसेल फरक

SCROLL FOR NEXT