Jalgaon News
Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: पत्नी नांदायला येत नाही म्हणून लग्‍न समारंभातून शालकाचेच केले अपहरण

साम टिव्ही ब्युरो

पाचोरा (जळगाव) : साकोरा (ता. नांदगाव) येथील रहिवासी असलेल्या धनराज पाटील याने पत्नी नांदायला येत नाही म्हणून सात वर्षीय शालकाचे लग्न (Marriage) समारंभातून अपहरण केले. अखेर पोलिसांच्या सतर्कतेमुळे धनराजसह त्याचा शालक मनमाड (Manmad) येथे पोलिसांच्या हाती लागला. धनराजला अटक करण्यात आली असून अल्पवयीन शालकास त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले आहे. (Breaking Marathi News)

नगरदेवळा सीम (ता. पाचोरा) येथील सासर असलेल्या धनराज पाटील याची पत्नी गेल्या महिन्यांपासून माहेरी आहे. ती सासरी येत नसल्याने तिला घाबरवण्यासाठी धनराजने शालकाचेच अपहरण करण्याचा प्लॅन आखला. पाचोरा येथील रामानंदनगरात २९ मे रोजी नातलगाच्या विवाह सोहळ्यासाठी पत्नीचा भाऊ गौतम (वय ७) हा आलेला होता. धनराजने या विवाह सोहळ्यातून त्याचे अपहरण करत पळवून नेले. विवाह सोहळ्यात गौतम दिसत नसल्याने त्याचा शोध सुरू झाला. परंतु धनराजने त्याला सोबत नेल्याचे काहींनी सांगितल्याने धनराजच्या पत्नीने पाचोरा पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांनी (Police) धनराज पाटीलच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवला होता.

मोबाईल लोकेशनवरून शोध

पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी धनराज व गौतमचा शोध घेण्यासाठी विश्वास देशमुख, अमोल पाटील या पोलिसांचे पथक तयार केले. त्यांनी गौतमचा (Pachora) पाचोरा व साकोरा (नांदगाव) परिसरात शोध घेतला. परंतु दोघे मिळून आले नाही. धनराज त्याच्या घरीही दिसला नाही. म्हणून धनराजच्या मोबाईलचे लोकेशन पोलिसांनी घेतले असता तो मनमाड येथे असल्याचे कळाले. पोलिसांनी मनमाड येथे जाऊन धनराज व गौतमचे फोटो तेथील रहिवाशांना दाखवत शोध घेतला असता दोघे एका गल्लीत फिरताना आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पाचोरा येथे आणले. धनराजला अटक करण्यात आली असून गौतम यास धनराजच्या पत्नीच्या म्हणजे गौतमच्या बहिणीच्या स्वाधीन करण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले; पर्यटक आणि भाजपच्या नेत्यावर गोळीबार

Relationship Tips: लग्नाआधी भावी जीवन साथीदाराला विचारा 'हे' ३ प्रश्न; नाहीतर आयुष्यात येतील दुःख

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

SCROLL FOR NEXT