Pachora Crime Saam tv
महाराष्ट्र

Pachora Crime : झोपेतच पत्नीचा गळा चिरला; चारित्र्याच्या संशयातून पतीचे भयानक कृत्य, नंतर केला आत्महत्येचा प्रयत्न

Jalgaon News : बरेच दिवस पत्नी माहेरी असल्याने खुशाल याने लहान मुलांसाठी पत्नीला विनवण्या करून काही दिवसांपूर्वीच पाचोरा येथे आणले. तरी देखील पत्नीच्या चारित्र्यावर खुशालचा संशय होता.

Rajesh Sonwane

पाचोरा (जळगाव) : लग्नानंतर पती- पत्नीमध्ये नेहमी वाद- भांडण होत होते. यातच पती कायम पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्या कारणाने अधिक वाद व्हायचे. यातूनच पतीने झोपेतच चाकूने पत्नीचा गळा चिरून व पोटात वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना पाचोरा तालुक्यात घडली आहे. सदर घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे. 

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात घडली आहे. प्रियंका खुशाल भदाणे असे घटनेत मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान जारगाव येथील खुशाल भदाणे हा बांधकाम कामगार होता. पाचोऱ्यातील श्रीकृष्ण हौसिंग सोसायटीत दोन महिन्यांपूर्वी खुशाल पत्नी व दोन लहान मुलांसह भाड्याच्या घरात वास्तव्यास आला होता. पती- पत्नीत सतत वाद होत असल्याने प्रियंका गेल्या काही दिवसांपासून आपल्या माहेरी गेली होती.

माहेरी असलेल्या पत्नी काही दिवसांपूर्वीच आली  

बरेच दिवस पत्नी माहेरी असल्याने खुशाल याने लहान मुलांसाठी पत्नीला विनवण्या करून काही दिवसांपूर्वीच पाचोरा येथे आणले होते. तरी देखील पत्नीच्या चारित्र्यावर खुशालचा संशय होता. त्यामुळे त्यांच्यात नेहमी खटके उडायचे. यातच १९ जुलैला रात्री दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. मात्र या वादातून खुशालने २० जुलैला पहाटे चारच्या सुमारास उठून झोपेत असलेल्या पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करून तिचा अर्धा गळा चिरला. त्यानंतर पोटावर सपासप वार केले.

आईला पाहून मुलांचा आरडाओरड 

चाकूने वार केल्यामुळे प्रियांका रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. अशा परिस्थितीत खुशालनेही गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र आईच्या किंकाळ्यांमुळे झोपलेली दोन्ही लहान मुले जागी झाली. त्यांनी आईला पाहून आरडाओरड केल्याने शेजारी धावत आले. त्यांनी गळफास घेणाऱ्या पतीस रोखून त्याचे प्राण वाचविले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसही घटनास्थळी पोहोचले. यानंतर खुशाल भदाणे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Price : पेट्रोल-डीझेलचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी एकदा चेक कराच

Maharashtra News Live Update: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल

Bhandardara Tourism: हिल स्टेशन नंतर फिरा; या विकेंडला भंडारदऱ्याला काजवा महोत्सव आवर्जून पाहून या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून 73 लाख महिला अपात्र; किती महिला कुठल्या कारणामुळे वगळल्या गेल्या?

Mahayuti Candidate List : पुणे, सोलापूर ते नाशिक, नागपूर; पाहा महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT