Jalgaon ZP saam tv
महाराष्ट्र

Jalgaon: गट रचनेवरच सदस्यांची राजकीय गणिते; इच्छुकांचे आरक्षणाकडे लक्ष

गट रचनेवरच सदस्यांची राजकीय गणिते; इच्छुकांचे आरक्षणाकडे लक्ष

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जळगाव : जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची मुदत मार्चमध्ये संपणार आहे. त्यामुळे अगामी निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय हालचालींना वेग आला आहे. नव्याने गट व गणांची रचना झाल्यानंतर गट रचनेवरच सदस्यांची राजकीय गणिते अवलंबून राहणार आहेत. नव्या जिल्हा परिषद गट (Jalgaon ZP) व पंचायत समिती गणाच्या रचनेत कुठल्या भागाचा समावेश होणार आहे किंवा कुठल्या गटात कुठले गाव जाणार आहे, विद्यमान सदस्यांची गाव नव्या गट रचनेत राहणार की नाही, याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. (jalgaon news zp election Political calculations of members only on group composition)

त्यातच तालुक्यांमध्ये गट रचनेत होणाऱ्या बदलात आपले गाव दुसऱ्या गटात जाते की काय, अशी धास्ती विद्यमान सदस्यांना लागली आहे. विद्यमान सदस्यांनी आपल्या गटात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. त्यामुळे नव्याने होणाऱ्या जिल्हा परिषद गट (Zilha Parishad) रचनेच्या व्यूहरचनेवरच सदस्यांची राजकीय गणिते अवलंबून राहणार आहेत. राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये जागा वाढवण्यात येणार आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे जिल्हा परिषदेचे दहा गट तर पंचायत समितीचे वीस गण वाढणार आहे. त्यामुळे (Jalgaon News) निवडणुकीच्या रिंगणात उतरू पाहणाऱ्या इच्छुकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

जागांनुसारच ठरणार रणनीती

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जागा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. आगामी निवडणुकीत या जागा वाढणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील समीकरणांमध्ये मोठा बदल होणार आहे. या वाढलेल्या जागांनुसार राजकीय पक्षांना आपली रणनीती ठरवावी लागणार आहे. तर सर्वच राजकीय पक्षांना नव्याने वाढ होणाऱ्या गट व गणात आपलीच सरशी कशी होईल, याची व्यूहरचना तयार केली जात आहे.

मोर्चेबांधणीला सुरवात

राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांनी आपापले गट आणि गणांमध्ये मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांच्या स्वरूपांचे कच्चे आराखडे तयार करण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू झाल्याने आतापासूनच मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीचे रंग भरू लागले आहेत. इच्छुकांनी आतापासूनच गट-गणात संपर्क वाढवण्यास सुरवात केली आहे. गावोगावी विकासकामांचे भूमिपूजन करण्यासह प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्याच्यादृष्टीने राजकीय पक्षांच्या नेत्यांसह इच्छुक उमेदवारांकडून गावोगावच्या ग्रामस्थांच्या बैठका घेण्यावर भर दिल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर इच्छुकांचा प्रचाराची सुरवात झाली आहे. काहींनी पक्षाकडून अधिकृत उमेदवारी न मिळाल्यास अपक्षही उमेदवार म्हणूनही लढण्याची तयारी सुरू केली आहे.

इच्छुकांचे आरक्षणाकडे लक्ष

कोणत्या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणामध्ये कोणते आरक्षण पडणार, याबाबतचे चित्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. असे असले तरी, मागील दोन निवडणुकीच्यावेळी आरक्षण लक्षात घेऊन पुढील म्हणजे संभाव्य आरक्षणाचे इच्छुक उमेदवारांकडून आराखडे बांधले असून इच्छुकांनी आपापल्या मतदार संघात मोंर्चेबांधणी सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

Asia Cup 2025 : अभिषेक-तिलकची दमदार खेळी, संजू सॅमसनही चमकला; श्रीलंकेसमोर 'इतक्या' धावांचे आव्हान

SCROLL FOR NEXT