Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon : देवी विसर्जनावेळी नदीत बुडून तरुणाचा मृत्यू; आईचा एकच आक्रोश

Jalgaon News : कॉलनीत स्थापना केलेल्या देवीचे विसर्जन करण्यासाठी तरुण बांभोरी पुलाजवळ गिरणा नदी पात्रात उतरले होते. मूर्ती विसर्जित केल्यानंतर तरुणाचा तोल गेल्याने नदीत पडला आणि वाहून गेला

Rajesh Sonwane

जळगाव : नवरात्रोत्सव साजरा झाल्यानंतर देवीचे विसर्जन करण्यात आले. दरम्यान देवीची मूर्ती विसर्जन करीत असताना तोल जाऊन पाण्यात पडल्याने एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना गिरणा नदीत घडली आहे. आई आणि बहिणीच्या डोळ्यादेखत तरुण नदीच्या प्रवाहात वाहून जात बेपत्ता झाला होता. यावेळी मुलाला वाचविण्यासाठी आईने आक्रोश केला होता. 

जळगाव शहरातील दादावाडी परिसरातील रहिवासी हितेश संतोष पाटील (वय १९) असे गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. कॉलनीत स्थापना केलेल्या देवीचे विसर्जन करण्यासाठी तरुण बांभोरी पुलाजवळ गिरणा नदी पात्रात उतरले होते. दादावाडी परिसरातील हितेश पाटील मित्रांसह दुपारी बांभोरीजवळील सुरत रेल्वे पुलानजीक गिरणा नदीपात्रात देवीची मूर्ती विसर्जनासाठी गेला होता. 

हितेशने नदीत उतरून देवीच्या मूर्तीचे विसर्जन केले. नदीच्या पाण्याचा प्रवाह जोरात होता. यावेळी मूर्ती विसर्जित केल्यानंतर हितेशला तोल गेला आणि तो नदीत पडला. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने प्रवाहासोबत तो वाहू लागला होता. यावेळी सोबतच्या मित्रांनी आरडाओरड केली. मात्र हितेशला वाचविण्यात यश मिळाले नाही. 

डोळ्यादेखत मित्र वाहून गेला 

डोळ्यासमोर हितेश बुडाल्याचे पाहून त्याच्या मित्रांनी तरुणाचा भाऊ हिमेश पाटील याला घटनेची माहिती दिली. त्यावरून कुटुंब व परिसरातील नागरिक घटनास्थळी पोहोचले. तसेच, महापालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. त्या वेळी बचाव पथकासह महसूल, तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पथकाने सायंकाळी सातपर्यंत तरुणाचा शोध घेतला. यावेळी हितेशच्या आईने एकच आक्रोश केला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : खुशखबर! दसरा-दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹२,००० येणार, महत्त्वाची अपडेट समोर

Mumbai Accident: मुंबईत एकाच रात्री दोन भयानक अपघात; रस्ता ओलांडताना तरुणीचा मृत्यू, डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा करूण अंत

दारूची बाटली, भरलेले पेग अन्...; शवविच्छेदन विभागात रंगली दारू पार्टी; पुण्यातील YCM रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Maharashtra News Live Update: विजय संकल्प मेळाव्यातून किरण सरनाईक यांच्या विजयाचा निर्धार

CJP Protest: 'सेंट्रल पार्कमध्ये तिरंगा फडकवता येणार पण...' दिल्ली पोलिसांची CJP समोर ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT