जळगाव : जळगाव शहरातील समतानगरातील तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून अत्महत्या केल्याची घटना घडली. रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुधीर नाना साळुंखे (वय-३३ रा. समता नगर) असे मयत तरूणाचे नाव आहे. (jalgaon-news-young-man-suicide-at-home-in-late-night)
शहरातील समतानगर परिसरात सुधीर साळुंखे हा आई– वडील, पत्नी व भाऊसोबत वास्तव्याला आहे. तो सुरत येथे कामानिमित्ताने वास्तव्याला होता. कोरोनामुळे कामाकाज बंद झाल्यानंतर पत्नीसह जळगावला आले होते. सध्या ते नोकरीच्या शोधात होते. मात्र शनिवारी (११ डिसेंबर) रात्री कुटुंबियांसह जेवण करून सर्वजण झोपले होते. मध्यरात्री सर्वजण झोपलेले असतांना सुधीर साळुंखे यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली.
कुटुबियांचा आक्रोश
सुधीर यांनी आत्महत्त्या केल्याचे दिसताच कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होवून पंचनामा केला. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अतुल चौधरी करीत आहे. मयत सुधीरच्या पश्चात आई मालूबाई, वडील नाना साळुंखे, भाऊ मुकेश, पत्नी मोनाली, मुलगी पुर्वा आणि दीड वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.