Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: जेवण करून सर्वजण झोपले; पहाटे उठले असता कुटूंबाला बसला धक्‍का

जेवण करून सर्वजण झोपले; पहाटे उठले असता कुटूंबाला बसला धक्‍का

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : शहरातील निवृत्तीनगरातील तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (१३ मे) पहाटेच्या सुमारास घडली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हेमंत राजेंद्र चौधरी (वय ३४, रा. निवृत्तीनगर) असे मृत तरूणाचे नाव आहे. (Live Marathi News)

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार चौधरी हे पत्नी व दोन मुलांसह निवृत्तीनगरात वास्तव्याला असून, पेंटरचे काम करून उदरनिर्वाह करत होते. १२ मे मध्यरात्री घरात सर्वजण झोपलेले असताना हेमंत यांनी किचनमध्ये दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार शनिवारी पहाटे पाचला पत्नी गायत्री यांच्या लक्षात येताच त्यांनी हंबरडा फोडला.

नागरिकांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. हेमंत यांच्या मागे आई मंगला, पत्नी गायत्री, मुलगा प्रतिक (वय १६) आणि मुलगी माही (वय ८), भाऊ विनोद आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजलेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टिपू सुलतान यांचा फोटो लाऊन महाराष्ट्राचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात-आमदार संग्राम जगताप

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

Bullet Train: मुंबई-पुणे प्रवास फक्त 40 मिनिटांत; पुणे, सोलापूरसह 25 हून अधिक शहरं जोडली जाणार! हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला वेग

Churchgate Tourism : काळे ढग, रिमझिम पाऊस अन् हिरवीगार मुंबई! वीकेंडला फिरा 'ही' ५ निसर्गरम्य ठिकाणे

SCROLL FOR NEXT