Suicide Saam tv
महाराष्ट्र

रात्री बहिणीकडे जेवण करून आला अन्‌ घेतला गळफास

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : कुसुंबा (ता. जळगाव) येथील तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्‍महत्‍या केली. गावातच राहणाऱ्या बहिणीकडे रात्री जेवण करून घरी आल्‍यानंतर मध्‍यरात्रीच्‍या सुमारास आत्महत्या (Suicide) केली. आत्‍महत्‍येचे कारण समजू शकले नसून धनंजय चंद्रजित बाविस्कर (वय २५) असे तरूणाचे नाव आहे. (jalgaon news young man committed suicide by hanging himself)

धनवाडी (ता. चोपडा) येथील मुळ रहिवासी असलेला धनंजय बाविस्कर हा गेल्या दोन वर्षांपासून पत्नी उज्ज्वलासह कुसूंबा येथे (Jalgaon News) वास्तव्याला होता. याच गावात धनंजयची बहिण शुभांगी आणि मेहुणे दिपक पाटील देखील राहतात. एमआयडीसीतील ट्रान्सपोर्ट कंपनीत नोकरीला होता. दरम्यान अक्षयतृतीयेच्या निमित्ताने पत्नी उज्ज्वला माहेरी गेली असल्याने धनंजय हा घरी एकटाच होता. शनिवारी २३ एप्रिल रोजी रात्री १० वाजता बहिण शुभांगीकडे जेवण केले आणि तो त्याच्या घरी निघून आला.

सकाळी दार न उघडल्‍याने आली शंका

मध्यरात्री धनंजयने रूमालाने गळफास घेवून आत्महत्या केली. आज सकाळी बराच वेळ झाला तरी धनंजय उठला नाही; यामुळे शेजारी राहणाऱ्यांना शंका आली. शुभांगी ह्या घरी आल्यावर भावाने गळफास घेतल्याचे लक्षात आले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Jalgaon Medical Collage) दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांना मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास महेंद्र गायकवाड, नरसिंग पाडवी हे करीत आहे. शविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मयताच्या पश्चात पत्नी उज्वला, आई, वडील व बहिण असा परिवार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Jalna Accident: जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात! ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

SCROLL FOR NEXT